सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 09:09 PM2021-01-17T21:09:47+5:302021-01-19T01:39:36+5:30
निफाड : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्यांनी येथील वृद्ध महिलेच्या दीड लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.
निफाड : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात भामट्यांनी येथील वृद्ध महिलेच्या दीड लाख किमतीच्या सोन्याच्या बांगड्या हातचलाखीने लंपास केल्याची घटना शनिवारी (दि.१६) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.
निफाड येथील भवर गल्लीमध्ये राहणाऱ्या पद्माबाई कन्हैया चोरडिया (८१) या वृद्ध महिलेकडे शनिवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकलवर दोन जण आले. त्यांनी पद्माबाई यांना घराबाहेर बोलावले व तुमच्या सोन्याच्या बांगड्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. पद्माबाई यांनी त्यांच्या हातातील दीड लाख रुपये किमतीच्या पाच तोळे सोन्याच्या दोन बांगड्या त्यांच्याकडे दिल्या. त्यानंतर त्यातील एकाने पावडर काढली व एक ग्लास पाणी आणावयास सांगितले. पाणी आणून दिल्यानंतर त्याने सदर बांगड्यांना पॉलिश करून सदर बांगड्या पद्माबाई यांच्या पदरात ठेवून ते पसार झाले. त्यानंतर पद्माबाई यांनी पदरात बघितले असता त्यात काहीच नसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना फसवणुकीबद्दल सांगितले. त्यानंतर निफाड पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे . याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार नितीन मंडलिक, पोलीस कॉन्स्टेबल दीपक पगार, राजू मनोहर हे करीत आहेत.