ठेक्याच्या आमिषाने महिलांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:34 PM2020-06-19T22:34:12+5:302020-06-20T00:26:26+5:30
आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी : आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगून कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका व डबे लावण्याचे अमिष दाखवत दोन महिलांची ३७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमलता सुनील जमधडे (४४, रा. सदिच्छानगर, पाथर्डी रोड, नाशिक यांचा फळे व कापड विक्र ीचा व्यवसाय आहे. त्यांच्या संपर्कात राजू रामचंद्र भामरे (वय ५५) हा इसम आला. आपण आॅटोमोबाइल कंपनीचा व्यवस्थापक असल्याचे सांगत कंपनीत पापड पुरविण्याचा ठेका द्यावयाचा आहे तसेच सोनी राजकुमार गुप्ता यांना कंपनीत डबे लागतील असे आमिष जमधडे यांना दाखवले. त्याने त्याबाबत बाँड करावा लागेल असे सांगून दोन महिलांकडून अनुक्र मे १७ व २० हजार रु पये दिंडोरी येथे घेतले. एकूण ३७ हजार रुपये घेऊनही त्याने पुढे काहीही हालचाल केली नाही. भामरे याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना या महिलांची झाली आणि त्यांनी ही माहिती आपल्या परिचित वकिलाला दिली.
त्यानंतर भामरे यास दिंडोरी येथे बोलावून पोलिसांच्या हवाली केले. सदर महिलांच्या तक्रारीवरून राजू भामरे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.