कांदा विक्रीतून फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:41 AM2020-12-11T04:41:18+5:302020-12-11T04:41:18+5:30

करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा २९ क्विंटल कांदा खरेदी करून तोच कांदा अन्य दुसऱ्या व्यक्तीला विक्री करत त्यातून मिळालेले ५८ हजार ...

Fraudster on sale of onion caught by police | कांदा विक्रीतून फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात

कांदा विक्रीतून फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात

Next

करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचा २९ क्विंटल कांदा खरेदी करून तोच कांदा अन्य दुसऱ्या व्यक्तीला विक्री करत त्यातून मिळालेले ५८ हजार पाचशे रुपये शेतकऱ्याला न देता फसवणूक करणाऱ्या संशयिताला पंचवटी पोलीस ठाणच्या गुन्हे शोध पथकाने ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे.

गेल्या महिन्यात बाजार समितीत फसवणूक घटना घडली होती. याबाबत नानाजी निंबा साबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इजाज उस्मान अन्सारीवर (५६) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या महिन्यात साबळे यांनी २९ क्विंटल ४५ किलो कांदा विक्रीला पेठरोड कांदा बाजारात आणला होता. त्यावेळी मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर संशयित अन्सारीने साबळे यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून २७ रुपये किलो दराने कांदा खरेदी केला व पुन्हा तो कांदा अन्य व्यक्तीला २० रुपये किलोने विक्री करत त्याचे मिळालेले ५८ हजार ५०० रुपये साबळे यांना न देता पळून गेला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे फुटेज मिळवून त्याचा मोबाइल क्रमांक मिळविला. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या

आधारे त्याचे लोकाशन काढले असता तो सुरुवातीला गुजरात राज्य, मुंबई, ठाणे, भिवंडी असे आल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी अन्सारी याच्या शोधासाठी परजिल्ह्यात धाव घेतली. त्याचे लोकेशन भिवंडी दाखविल्याने पोलीस पथकाने अन्सारीला ताब्यात घेतले. संशयित भद्रकाली दूध बाजारात फिरस्ता असतो. त्याने यापूर्वी औरंगाबाद, कन्नड तसेच मालेगाव व सटाणा येथे अशाच प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. गुन्हे पोलीस निरीक्षक अशोक साखरे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, विलास चारोस्कर, नितीन जगताप यांनी कामगिरी केली.

Web Title: Fraudster on sale of onion caught by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.