ग्रामरोजगार सेवकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:22 PM2020-03-06T14:22:57+5:302020-03-06T14:23:15+5:30
कणकोरी : रोहयोचे अनुदान लाटण्याचा प्रयत्न
सिन्नर : तालुक्यात काही वर्षांपूर्वी रोजगार हमीच्या कामांवर झालेल्या अनियमिततेच्या प्रकारांची चर्चा चांगलीच रंगली होती. याच काळात कणकोरी येथील ग्रामरोजगार सेवकाने बंधाऱ्याच्या कामाचे बनावट कार्यारंभ आदेश आणि प्रशासकीय मान्यता दाखवून ३३८ मजुरांच्या नावे मजुरी मिळावी म्हणून प्रयत्न केल्याप्रकारणी सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्र ारीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मे २०१३ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत ग्रामरोजगार सेवक अनिल शिवाजी बुचकुल याने कणकोरी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणाºया भूमिगत बंधाºयाच्या कामासाठी बनावट स्वाक्षºयांच्या आधारे बनावट कार्यारंभ आदेश तयार केला. बंधाºयांच्या कामावर दाखवलेल्या ३३८ मजुरांची मजुरी मिळवण्यासाठी सिन्नर पंचायत समितीकडे तो सादर करण्यात आला होता. सदरचे आदेश हे बनावट आहेत हे माहिती असून देखील बुचकुल याने ते कणकोरी ग्रामपंचायत आणि पंचायत समतिी स्तरावर सादर करून खोट्या कामाची मजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पंचायत समिती स्तरावरून या कथित कामाची चौकशी झाल्यावर बुचकुल याने केलेला फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. खोट्या कागद पत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसठाण्यात बुचकुल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक रामदास धुमाळ तपास करीत आहेत.