भागीदारीचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:29 PM2019-10-14T22:29:30+5:302019-10-15T00:54:46+5:30
केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून एका महिलेची चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिकरोड : केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून एका महिलेची चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी विजया कैलास पवार (अयोध्या नगरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रोहन भोळे (रा. गंधर्वनगरी, नाशिकरोड) याच्याशी जीममध्ये ओळख झाल्यानंतर त्याने केबल व्यवसायात भागीदारीचे आमिष दाखवून केबल व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानुसार भोळे यास बँकेतील एफडी व सोने विकून दहा लाख रु पये रोख दिले. काही दिवसांनी पवारांना आर्थिक अडचण आल्यानंतर त्यांनी भोळे यांच्याकडे पाच लाखांची मागणी केली. ही रक्कम त्याने परत दिली. काही दिवसांनी पुन्हा व्यवसायासाठी पैशांची मागणी केली. त्यामुळे पवारांनी पुन्हा त्यास नऊ लाख ७० हजार रु पये रोख दिले. अशाप्रकारे १५ लाख २० हजार रुपये भोळेला दिले. त्यातील एक लाख दहा हजार त्याने परत केले. पवार यांनी नंतर भोळेला व्यवसायातील भागीदारी-बाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्याकडे उर्वरित १४ लाख २० हजार मागितले असता त्याने शिवीगाळ व दमबाजी सुरू केली. भोळेने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पवारांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्र ार नोंदवली.