दिवसभरात जिल्ह्यातील ६८१ बाधित कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 01:23 AM2020-08-08T01:23:50+5:302020-08-08T01:24:09+5:30
जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे.
नाशिक : जिल्ह्यातील ६८१ बाधितांना शुक्रवारी (दि.७) रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १४ हजार ०१६ वर पोहोचली आहे. शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूमुळे आत्तापर्यंतच्या बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४ हजार ३४६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३११५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात २२६, नाशिक ग्रामीणला ९९३, तर जिल्ह्याबाहेरील २० असे एकूण ४ हजार ३४६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १८ हजार ९४७ रु ग्ण आढळून आले असून, त्यातील १४ हजार ०१६ रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, शुक्रवारी महानगरात ०२, मालेगाव महापालिकेत ०३, नाशिक ग्रामीणला २ असे सात मृत्यू झाल्यामुळे एकूण बळींची संख्या ५८५ वर पोहोचली आहे. शुक्रवारी जिल्ह्णात नवीन ६८१ रुग्णबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या १८,९४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्णात रु ग्ण बरे होण्याची टक्केवारी दिलासा देणारी असून, नाशिक ग्रामीणमध्ये ७४.३० टक्के, नाशिक शहरात ७३.१९ टक्के, मालेगावमध्ये ७८.८४ टक्के, तर जिल्ह्णात रु ग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८१.८२ टक्के आहे. जिल्ह्णात बरे होण्याचे प्रमाण सरासरी ७३.९७ टक्के इतके आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ८१४ नवीन संशयित दाखल झाले असून, प्रलंबित अहवालांची संख्यादेखील १२९८ वर पोहोचली आहे.