वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी ंमोफत रु ग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 06:34 PM2019-07-13T18:34:22+5:302019-07-13T18:34:44+5:30
भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात.
बाजीराव कमानकर
सायखेडा : भक्ती रसात तल्लीन होऊन जाणाºया वारकऱ्यांसाठी किती करावे आणि काय काय करावे असे समाजातील अनेक दानशूर व्यक्तींना वाटत असते. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यातील वारकºयांना पंचवीस दिवस काहीही कमी पडू नये याची काळजी सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक लोक घेत असतात.
पावसाळ्यातील या वारीत कधी थंडी तर कधी सलग पावसाची रिमझिम सुरू असल्याने पंचवीस दिवसांच्या पायी प्रवासात अनेक वारकरी आजारी पडतात. काही महिलांना त्रास होतो, तर वृद्ध वारकरी वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त होतात. अशा आजारी वारकºयांच्या सेवेसाठी भेंडाळी येथील नितीन सातपुते
दहा वर्षांपासून आपल्या दोन
रुग्णवाहिका आरोग्यदूत म्हणून वारकºयांसाठी उपलब्ध करून देतात. विशेषत: ते स्वत: व त्यांचे लहान
बंधू बाळासाहेब सातपुते हे दोघे
रूग्णवाहिका घेऊन जातात. आजारी वा व्याधीग्रस्त वारकºयांना कधी विश्रांतीची, तर कधी इंजेक्शन, सलाईन गरज असते. अशावेळी रु ग्ण वारकºयाला गाडीत झोपून इलाज केला जातो. तर कधी कधी शहरी भागातील मोठ्या दवाखान्यात दाखल करावे लागते अशावेळी सातपुते आपल्या गाडीतून घेऊन जातात विशेषत: ते या सेवेतून कोणताही मोबदला घेत नाही केवळ सेवा म्हणून ते वर्षानुवर्षे अशी समाजसेवा करत आहे.
सातपुते बंधू ग्रामीण भागातील रु ग्णांना तातडीने शहरातील दवाखान्यात नेण्याचे काम करत असतात, तर कधी दवाखान्यातून रूग्ण घरी आणण्याचे काम करतात. वर्षभर हा त्यांचा व्यवसाय असला तरी वर्षातील पंचवीस दिवस ते कोणताही मोबदला न घेता पदरमोड करून वारकºयांसाठी सेवा उपलब्ध करून देतात. या सेवेमुळे वेळेत उपचार मिळाल्याने अनेक वारकºयांचे प्राण वाचले आहेत, वर्षानुवर्षे आरोग्यदूत म्हणून वारकºयांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे सातपुते बंधू सांगतात.