गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:12 AM2021-07-21T04:12:09+5:302021-07-21T04:12:09+5:30
शिवाजीवाडी व नंदिनीनगर परिसर हातावर काम करून उदरनिर्वाह करणारी कष्टकरी लोक वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकांची ...
शिवाजीवाडी व नंदिनीनगर परिसर हातावर काम करून उदरनिर्वाह करणारी कष्टकरी लोक वस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकांची वस्ती असून, यामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाची वह्या पुस्तके घेता येत नाहीत, तर इतर पुस्तके कशी घेणार, असा प्रश्न त्यांच्यापुढे असतो. याची दखल घेत गर्जना युवा प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील विद्यार्थ्यांना नवीन काही शिकण्याची आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून गाणी, गोष्टी, आत्मचरित्र, कथा, कादंबरीसह विविध प्रकारची पुस्तके वाटप करण्यात आली.
परिसरातील एका सुुशिक्षित मुलाकडे पुस्तक बँकेची जबाबदारी देण्यात आली. परिसरातील विद्यार्थी गरजेनुसार त्या बँकेतून हवी ती पुस्तके घेऊ शकतात. वाचन करून परत जमा करायची आहेत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव, कुमार भार्गवे, किरण लांडे, विजय जोशी, सुधीर माळी, सुनील बाविस्कर, मंगेश चव्हाण, उमेश कांबळे, हर्षल सानप, राजू बाबर उपस्थित होते.
200721\20nsk_25_20072021_13.jpg
विद्याथ्य'ांना पुस्तके वाटप करतांना गर्जना युवा प्रतिष्ठानचे पदाधिकाारी