इगतपुरी शहरात बिबट्याचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 05:29 PM2020-01-23T17:29:45+5:302020-01-23T17:30:15+5:30

भीतीचे वातावरण : वनविभागाने लावला पिंजरा

 Free communication in the city of Igatpur | इगतपुरी शहरात बिबट्याचा मुक्त संचार

इगतपुरी शहरात बिबट्याचा मुक्त संचार

Next
ठळक मुद्दे याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मोठा वावर असतो

इगतपुरी : शहरातील रेल्वे वसाहत, गावठा, शिवाजी नगर, मिलिंद नगर, पाइपलाइन परिसरात बिबट्याचा सध्या मुक्त संचार सुरु असून परिसरातील नागरिकांना चार-पाच दिवसांपासून बिबट्याचे रोजच दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे.
इगतपुरी शहरात रात्री-बेरात्री बिबट्या नागरीकांना परिसरातील वेगवेगळ्या भागात दर्शन देतो आहे. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुधन सांभाळण्यासाठी शेतकरी रात्र जागून काढत आहेत. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. शेती कामानिमित्त शेतातच राहणारे शेतकरी जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. या परिसरात रेल्वेचे अनेक महत्वाची कार्यालये असून, रेल्वे वसाहत देखील आहे. त्यामुळे याठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मोठा वावर असतो. परिसरातून विद्यार्थी, रेल्वे कामगार, महिला वर्ग कामासाठी या रस्त्याने दुचाकी वरु न तसेच पायी ये जा करत असतात. आता बिबटयाच्या संचारामुळे सायंकाळी सात नंतर अघोषित संचारबंदी लागू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पशुधन धोक्यात
आम्ही शेती कामानिमित्त मळ्यातच राहतो. शेतीला पाणी भरणे, विद्युत मोटारी सुरु करणेसाठी रात्री-बेरात्री ये-जा करावी लागते. पर्याय नसल्याने जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. दररोज परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचे दर्शन होते आहे. त्यामुळे पशुधनही धोक्यात आले आहे. वनविभागाने एखादी अप्रिय घटना घडण्याअगोदर यावर कार्यवाही करावी.
- भूषण जाधव, नागरिक , गावठा

Web Title:  Free communication in the city of Igatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक