वटार परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 10:06 PM2019-12-27T22:06:21+5:302019-12-27T22:09:55+5:30
वटार : येथील तळवाडे रस्त्यालगत लक्ष्मण धर्मा खैरनार यांच्या राहत्या घराजवळ गायीच्या गोठ्यावर मध्यरात्री हल्ला केला, पण त्याचवेळेस खैरनार बाहेर निघाले असता बिबट्याने वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना, तेवढ्यात खैरनार यांनी आरडाओरड केली असता बिबट्याने पलायन केल्यानंतर वासराची मुक्तता झाली.

या झटापटीत वासरू जखमी झाले असून, त्याच्या मानेवर जखम झाली आहे. त्याच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने उपचार केले असून, वासरू सुखरूप आहे. पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून, पशुधन पुन्हा धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याचा वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दूध देणारी जनावरे मोठ्या प्रमाणात आहेत, पण अचानक बिबट्याचा वावर असल्याने पशुधन वेठीवर आले आहे. देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे वासराचे प्राण वाचले आहेत. या परिसरात बिबट्याचा बºयाच दिवसांपासून वावर असून, काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शनही झाले आहे.मेंढपाळ तर दरवर्षीप्रमाणे त्रस्त असून, दरवर्षी चार ते पाच मेंढ्या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे रात्रही जागून काढावी लागत आहे. मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करीत आहेत.