महाराजा गायकवाड यांच्या कार्याचा ई-बुक्सद्वारे जगभर मोफत प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:43+5:302021-08-14T04:18:43+5:30

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याबाबत महाराष्ट्रात पुरेशी माहिती नाही. या अनुषंगाने सयाजीरावांच्या कार्याचे वेगळ्या पैलूतून संशोधन करण्यात आले. सयाजीराव ...

Free distribution of Maharaja Gaikwad's work all over the world through e-books | महाराजा गायकवाड यांच्या कार्याचा ई-बुक्सद्वारे जगभर मोफत प्रसार

महाराजा गायकवाड यांच्या कार्याचा ई-बुक्सद्वारे जगभर मोफत प्रसार

Next

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याबाबत महाराष्ट्रात पुरेशी माहिती नाही. या अनुषंगाने सयाजीरावांच्या कार्याचे वेगळ्या पैलूतून संशोधन करण्यात आले. सयाजीराव आधुनिक भारतातील प्रागतिक राजे होते. धर्म, जात, तत्त्वज्ञान, शिक्षण, संशोधन, शेती, उद्योग, आरोग्य, क्रीडा, साहित्य, संस्कृती, ललितकला, प्राच्यविद्या, पुरातत्व, आंतरराष्ट्रीय संबंध, स्वातंत्र्यलढा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी निर्माण केलेले मानदंड आदर्श आहेत. महापुरुषांचे चिंतन इतिहासाचा पोकळ अभिमान बाळगण्यासाठी नसते. समकालीन समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी आणि जीवनसंघर्ष सकारात्मक करण्यासाठी महापुरुषांच्या कार्याचे पुनर्वाचन आवश्यक ठरते. या विचारातून ई-बुक ज्ञानमाला प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक आणि जातीय संघर्षावर, शेती-उद्योगातील संकटांवर मात करण्यासाठी आणि सुसंवाद वाढविण्यासाठी ज्ञानमाला उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.

कोट...

पहिल्या टप्प्यात ६० ई-बुक्सची निर्मिती करण्यात आली असून, ५० ई-बुक्सचे काम सुरू आहे. या मालेत एकूण ११० ई-बुक्स तयार होत असून, लवकरच छापील स्वरूपातही उपलब्ध होतील. ८ जुलैपासून एक दिवसाआड ई-बुक्स फेसबुक, व्हॉट्सॲप, ई-मेल याद्वारे मोफत स्वरूपात सातत्याने जगभर पोहचविली जात आहेत. वाचक, इतिहास अभ्यासक आणि मान्यवरांचा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

- बाबा भांड, सचिव, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद

इन्फो...

वैविध्यपूर्ण संशोधनातील विषय

या ज्ञानमालेत संपादक दिनेश पाटील आणि संस्थेचे सचिव ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके आकारास आली आहेत. या वैविध्यपूर्ण संशोधनात धर्मविचार (बाबा भांड), कृतिशील सत्यशोधक (दिनेश पाटील), दानशूर महाराजा सयाजीराव (डॉ. राजेंद्र मगर), राजा रवी वर्मा (धारा भांड मालुंजकर), प्राच्यविद्या (सौरभ गायकवाड), पुरोहित कायदा (देवदत्त कदम), शिवसृष्टीचे निर्माते (सागर मोहिते), विठ्ठल रामजी शिंदे (पवन साठे), स्वतंत्र धर्मखाते (सुरक्षा धोंगडे), बडोद्यातील वेदोक्त (राजश्री कदम), स्त्रीविषयक कार्य (शिवानी धोंगडे), धर्मानंद कोसंबी (निलोफर मुजावर), सत्यशोधक धामणस्कर (सत्यनारायण आरडे), भारताचा स्वातंत्र्यलढा (राहुल वनवे) अशी विविध विषयांवरील ई-बुक्स वितरित करण्यात आली आहेत.

फोटो - १३ बाबा भांड

१३ सयाजी

130821\13nsk_43_13082021_13.jpg~130821\13nsk_44_13082021_13.jpg

सयाजी~बाबा भांड

Web Title: Free distribution of Maharaja Gaikwad's work all over the world through e-books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.