राष्ट्रवादी, किसान सभेकडून अधिकाऱ्यांना मोफत कांदा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:56 PM2019-01-09T18:56:53+5:302019-01-09T18:58:25+5:30
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे कांदे उत्पादनाचा खर्च फिटेल इतकाही गेली काही वर्षात भाव मिळाला नाही. त्याच्या निषेधार्थ सिन्नर येथे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस व राष्ट्रवादी किसान सभा यांच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी या अधिकाºयांना मोफत कांदा वाटप करण्यात आले.
कांदा उत्पादक शेतकरी अगदी मेटकुटीस आला आहे. सरकारचे शेती व शेतकरी विरूद्ध ध्येयधोरणे यामुळे कांदा तसेच कोणत्याच शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही. उत्पादन खर्च सोडा, साधे शेतापासून मार्केटपर्यंत शेतीमाल पोहचवण्याचे गाडीभाडे सुद्धा वसूल होत नाही. एका बाजूला सातवा वेतन आयोग देताना शेतक-याला साधी सात तास वीज देऊ शकत नाही, शेतीमालाला भाव देऊ शकत नाही म्हणून शासनाचे डोळे उघडण्यासाठी अधिका-यांना मोफत कांदा वाटप आंदोलन राबवत असल्याचे राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष जयराम शिंदे यांनी सांगितले.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे, माजी तालुकाध्यक्ष राजाराम मुरकुटे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, सरचिटणीस प्रमोद सांगळे, किसान सभा तालुकाध्यक्ष वामन पवार, भगीरथ रेवगडे, राजेंद्र भगत, सौरभ नाठे, धीरज मुठाळ, दशरथ रेवगडे, गणपत वाजे, प्रमोद सानप, राजेंद्र जगझाप, यतीन भाबड, अभिषेक माळी, तानाजी सानप, संकेत मुठाळ, सचिन परदेशी, राजू रेवगडे, एम. डी.पवार, बाळासाहेब डावरे, मेघा दराडे, आफ्रीन सय्यद आदी उपस्थित होते.