इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

By Admin | Published: January 5, 2017 01:36 AM2017-01-05T01:36:41+5:302017-01-05T01:36:57+5:30

इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

Free eye check-up of 130 patients in Igatpuri | इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

इगतपुरीत १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी

googlenewsNext

 इगतपुरी : शहरातील श्री साई सहाय्य समिती व नाशिक येथील गौरी नेत्र सेवा यांच्या विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १३० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करु न काही रूग्णांवर मोफत शस्त्रक्र ीया करण्यात आली.
दर वर्षी शहरातुन साई पालखी पदयात्रा काढण्यात येते. त्यानंतर साई भंडारा करण्यात येतो. या साई भंडाऱ्याचा शहरातील सर्व भाविक लाभ घेतात. यात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग असतो. या कार्यक्र माबरोबरच वयोवृध्दांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही मोठ्या प्रमाणात मोफत नेत्र तपासनी व शस्त्रक्र ीया शिबिरात नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी पालखी अध्यक्ष प्रवीण भटाटे, डॉ मंगेश वाघ व आयोजक तथा श्री साई सहाय्य समितीचे अध्यक्ष राजु देवळेकर यांसह तहसीलदार अनिल पुरे, पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, माजी उपनगराध्यक्ष सतीष कर्पे, अमोल मांडे, नितिन चांदवडकर, प्रदीप दगडे, लक्ष्मण मानकर, मन्ना बोहरी, बटी करपे, सागर आडार, निलेश मगरे, नितीन पवार, पवन जाधव, दिनेश मालविया, सदीप कदम, निखील करपे, सचिन कडभाणे, स्नेहल बोंडे, अमति सहाणे, चेतन शिदें, राहुल सिह, पुष्पा भाटी आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: Free eye check-up of 130 patients in Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.