चिऊ-काऊसाठी स्वतंत्र शेती

By admin | Published: May 21, 2017 12:01 AM2017-05-21T00:01:33+5:302017-05-21T00:03:00+5:30

भूतदया : युवा शेतकऱ्याची पक्ष्यांसाठी सोय

Free farming for Chiu-Kaou | चिऊ-काऊसाठी स्वतंत्र शेती

चिऊ-काऊसाठी स्वतंत्र शेती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : लहानपणी सर्वांना आई घास भरवताना एक घास चिऊचा तर दुसरा घास सोन्याचा.. असे बोबडे बोबडे बोल ऐकत पोटभर जेवण कधी होत असे हेच त्या लहानग्याला समजत नसे. परंतु आता मुक्या चिमुकल्या चिमण्या तसेच पक्षी यांना खाण्याची सोय व्हावी म्हणून येथील युवा शेतकरी राजेंद्र होळकर यांनी तब्बल एक एकर भरात लावलेल्या पिकाला ऐन उन्हाळ्यात पुरेपूर पाणी दिले.
परिणामी आता बहरलेल्या या धान्याचा पिकाला दाण्याची भरगच्च कणसे लागली आहेत.शेतात पीकपाणी घेताना पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून गोफणीने दगड फिरकले जातात किंवा पक्ष्यांना घाबरून जाण्याकरिता जोरदारपणे आवाज केले जातात. तसेच वेळप्रसंगी शेतात बुजगावणे उभे करतात; परंतु लासलगावचे कविमनाचे शेतकरी राजेंद्र दत्तात्रय होळकर यांनी स्वखर्चाने पक्ष्यांना आपले दाणे खाता यावे याकरिता स्वतंत्र शेतीची व्यवस्था केली. पीकपाणी घेऊन दाण्याची उपलब्धता करून दिली. आगळ्यावेगळ्या पद्धतीने पक्ष्यांसाठी खाण्याची सोय करून देत समाजात एक सुखद संदेश दिला आहे.

Web Title: Free farming for Chiu-Kaou

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.