विलगीकरणात गरजूंना मोफत आहार, औषधोपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:14 AM2021-05-11T04:14:34+5:302021-05-11T04:14:34+5:30
या निधीतून सर्व सुविधांनी युक्त असा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील रुग्णांना दररोज सकाळ - संध्याकाळी ...
या निधीतून सर्व सुविधांनी युक्त असा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील रुग्णांना दररोज सकाळ - संध्याकाळी अंडी, फळे, पोषक आहार व गरीब रुग्णांना मोफत व गरजूंना माफक दरात वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार देण्यात येत आहे. येत्या दोन दिवसात येथे डॉक्टरही उपलब्ध होणार आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षात दररोज रूग्ण वाढत आहेत. या सर्वांची या कक्षात व्यवस्था करण्यात येत आहे.
कोट....
कोविडचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. गावात विलगीकरण कक्ष कार्यान्वित करून बाधितांना आवश्यक असलेला औषध उपचार मिळाला पाहिजे, ही संकल्पना पुढे आली. त्यासाठी लोकसहभागातून आर्थिक उपाययोजना करण्याचे ठरले. ग्रामविकास समितीने त्याबाबत पुढाकार घेतला. आता तिसऱ्या लाटेची वाट न बघता आणखी काय उपाययोजना करता येतील, यावर भर देण्याकडे लक्ष देत आहोत.
- किरणकुमार घिया, सदस्य ग्रामविकास समिती, नायगांव
----------------------------
कोट...
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गावात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली. त्यामुळे चिंता वाढू लागली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध नियम व उपाययोजना केल्या आहेत. मात्र, ग्रामविकास समितीच्या माध्यमातून उभारलेल्या विलगीकरण कक्षात सर्वच स्तरातील रुग्णांची सोय होत आहे. त्याचबरोबर गरीब व गरजुंना मोफत औषधोपचार मिळत आहेत.
- मनीषा कदम, सरपंच, नायगाव.