वनविभागातर्फे मोफत गॅस कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 09:57 PM2019-12-22T21:57:40+5:302019-12-23T00:20:12+5:30
गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले.
घोटी : गरीब कुटुंबांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय असून, हा आनंद मोठे आत्मिक बळ निर्माण करणारा ठरतो, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सदस्य विठ्ठल लंगडे यांनी शेणवड बुद्रुक येथे केले.
शेणवड बु।। व खडकवाडी येथील ६१ गरीब कुटुंबांना वनविभाग, उपसरपंच कैलास कडू आणि हिंदुस्थान गॅस घोटी यांच्या मदतीने मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. यावेळी लंगडे बोलत होते.
शेणवड बुद्रुक आणि खडकवाडी गावात अनेक गोरगरीब कुटुंबांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कटिबद्ध आहोत, असे लंगडे म्हणाले.
उपसरपंच कैलास कडू यांनी गॅस कनेक्शन वाटपासाठी प्रयत्न केले. त्यांनी घोटी येथील हिंदुस्थान बिझ गॅसचे संचालक जयप्रकाश नागरे, वनविभागाचे अधिकारी आर. पी. ढोमसे, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांची भेट घेतली.
सरपंच कलावती खडके, उपसरपंच कैलास कडू, वन अधिकारी भाऊसाहेब राव, वन समितीचे अध्यक्ष काळू दिवटे, सचिव मुक्तीराम कोकाटे, हिंदुस्थान बिझ गॅसचे संचालक जयप्रकाश नागरे, ग्रामसेवक श्रीमती राठोड यांच्या उपस्थितीत गॅस कीटचे वितरण करण्यात आले.
वन अधिकारी राव म्हणाले, ध्येयाने प्रेरित होऊन सरपंचांनी लाभार्थींना मूलभूत गरजा देण्याकामी घेतलेला निर्णय सर्वांसाठी आदर्श आहे, असे सांगितले. यावेळी वनरक्षक नरेश न्याहारकर, चिंतामण गाडर, रूपावली गायकवाड, मंदा पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.