युनिक ग्रुपच्यावतीने मोफत धान्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:54+5:302021-05-31T04:11:54+5:30
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सलून, रिक्षा ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाच्यावतीने लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सलून, रिक्षा चालक व ऑर्केस्ट्रातील कलाकार यांचा रोजगार गेला आहे. त्याची दखल घेत युनिक ग्रुपच्यावतीने धान्याच्या १५० कीटचे वाटप आमदार सीमा हिरे, भाजपा शहर अध्यक्ष गिरीश पालवे, यांच्याहस्ते करण्यात आले. वडाळा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना आधुनिक फेस शिल्ड वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक तथा सभागृहनेता सतीश सोनवणे व अनिकेत सोनवणे यांनी केले होते. याप्रसंगी पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे, नगरसेवक भगवान दोंदे, सुनील देसाई, किशोर शिरसाठ, अनिल जाचक, शिवाजी लोखंडे, नवनाथ चव्हाणसह सदस्य उपस्थित होते.
===Photopath===
300521\30nsk_15_30052021_13.jpg
===Caption===
युनिक ग्रुपच्या वतीने मोफत धान्य वाटप करतांना आमदार सीमा हिरे, समवेत सतीश सोनवणे, अनिकेत सोनवणे आदि