संचारबंदीत नागरिकांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:26+5:302021-06-25T04:12:26+5:30
चौकट==== पोलिसांचे तंबू, मंडपही गायब कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच, रस्त्यावर जागोजागी ठाण मांडून ठेवलेले पोलिसांचे मंडप व तंबूही आता ...
चौकट====
पोलिसांचे तंबू, मंडपही गायब
कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच, रस्त्यावर जागोजागी ठाण मांडून ठेवलेले पोलिसांचे मंडप व तंबूही आता गायब झाले असून, शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी रस्त्यावर पोलीसही दिसेनासे झाले आहेत. दुपारी ४ वाजेनंतर संचारबंदी व जमावबंदीच्या आदेशाची अंमलबजावणीचे अधिकार कायद्याने पोलिसांना असूनही कोठेही त्याचे पालन करण्यास पोलिसांचा पुढाकार दिसत नाही.
चौकट====
पालकमंत्र्यांनीही केली नाराजी व्यक्त
निर्बंध शिथिलतेनंतर नागरिकांनी कोरोना विषयक नियमांचे पालन करणे गरजेचे असताना उलट जागोजागी गर्दी, सुरक्षित अंतराचे पालन न करणे, मास्कचा वापर न करण्याचे प्रकार वाढीस लागले असून, गुरुवारी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या आढाव्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संचारबंदीचे काटेकोरपालन करण्याबरोबरच मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.