नायगाव परिसरात बिबट्यांचा मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:52 PM2020-08-10T22:52:44+5:302020-08-11T01:21:07+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोºयात बिबट्यांचा मुक्तसंचार असून, भरदिवसा शेतशिवारात बिबट्यांचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाले आहेत.
नायगाव खोºयातील जोगलटेंभी, जायगाव व नायगाव आदी गावांमध्ये महिनाभरापासून बिबट्यांचा मुक्तसंचार आहे. चार दिवसांपासून नायगाव येथील अरुण भिकाजी जेजूरकर यांच्या गट नंबर ९३ परिसरात बिबटे मुक्कामाला असल्याचे आढळून आले आहे. दिवसभर तीनही बिबटे परिसरात फिरताना अनेकांना दिसले आहेत. यामुळे जेजूरकर यांच्यासह परिसरातील शेतकºयांच्या शेतीची कामे ठप्प झाली आहेत. सध्या खरिपाच्या कामाची लगबग सुरू असली तरी परिसरातील क्षेत्र बिबट्याच्या संचारामुळे खाटी ठेवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. दरम्यान वनविभागाने परिसरात पिंजरा लावला असला तरी हे बिबटे पिंजºयाभोवती फिरूनही त्यात अडकत नसल्यामुळे वनविभागाबरोबरच शेतकरी त्रस्त झाले आहेत. पंधरा दिवासांपूर्वी जोगलटेंभी परिसरात एक बिबट्या भक्ष्यांच्या नादात पिंजºयात अडकला होता. महिनाभरापासून या बिबट्यांनी जायगाव परिसरातील बोकड व कुत्र्यांची शिकार करत अनेकांना दर्शन दिले आहे. शिवारात अनेक शेतकरी वास्तव्यास असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडण्या अगोदर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच भाऊसाहेब लोहकरे यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.पशुपालक चिंतितनायगाव खोºयातील सर्वच गावांमध्ये सध्या बिबट्यांचा संचार वाढला आहे. कोरोनाच्या भीतीपाठोपाठ बिबट्यांची दहशत निर्माण झाली असल्यामुळे वाडी-वस्त्यांवर राहणाºया शेतकरी व पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. शेतात फिरणाºया बिबट्यांचा शेतकºयांनी काढलेला व्हिडीओ सध्या खोºयात फिरत आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्याआधीच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, दुपारीसुद्धा बिबट्यांचे दर्शन होत असल्याने भीतीचे वातावरण आहे.