गृहविलगीकरणात दाखवून बाधितांचा मुक्त वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:15 AM2021-03-25T04:15:15+5:302021-03-25T04:15:15+5:30
नाशिक : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सुमारे ८६ टक्के रुग्ण विलगीकरणातच आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे बाधितांच्या हातावर ...
नाशिक : शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी सुमारे ८६ टक्के रुग्ण विलगीकरणातच आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे बाधितांच्या हातावर
शिक्के नसल्याने अनेक बाधित घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आहेत.
महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे अशा चार ते पाच तक्रारी आल्यानंतर
त्यांनी प्रशासनाला याबाबत कळविले आणि कारवाई करण्यास भाग पाडले.
दरम्यान, गोविंद नगर येथील प्रतिबंधीत क्षेत्र नावालाच असून त्याविषयी
देखील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
फेब्रुवारी महिन्यांनतर शहरात पुन्हा कोरेानाचा संसर्ग वाढत चालला असून
नाशिक शहर हॉटस्पॉट ठरले आहे. गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान
ज्याप्रमाणे रुग्ण संख्या वाढली होती, तीच स्थिती आताही आहे. नाशिक
शहरात कोरोनाची साथ वाढत असली तरी गेल्या वेळी ज्या प्रमाणे रुग्णांचा
दाखल होण्यावर भर आहे. तसा आता दिसत नाही. गृहविलगीकरणात राहण्यावर भर
आहे. मात्र, कोरोना बाधित असतानादेखील अनेक नागरिक घरीच थांबत
नसल्याच्या तक्रारी आणि चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश
कुलकर्णी यांनी नागरिकांना अशाप्रकारे कोणीही रुग्ण गृहविलगीकरणातून
बाहेर पडत असल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले होेत. त्यानुसार काही
नागरिकांनी महापालिकेला कळविले आणि त्यानुसार प्रशासनाला कळवून
संबंधितांवर कारवाईच्या सूचना दिल्या.
इन्फो..
महापालिकेचे महाकवच ॲप बंद
महापालिकेच्यावतीने महकवच ॲप तयार करण्यात आले होते. एखादा बाधित
आढळल्यास त्याच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर बाधित केाणत्या
व्यक्तीच्या संपर्कात आल्याची माहिती मिळत होती त्या आधारे कॉन्टॅक्ट
ट्रेसींग केले जात हेाते. मात्र, ॲपच बंद करण्यात आले आहे.
कोट...
कोरोना संसर्ग बाधित काही व्यक्ती बाहेर फिरत आहेत. अशा तक्रारी आहेत. ही
गंभीर बाब आहे. बाधितांनी अशाप्रकारे अन्य नागरिकांच्या जीवाशी खेळ करू
नये. कोणाला काही मदत लागल्यास महापालिकेच्या यंत्रणेशी तत्काळ
संपर्क साधावा.
सतीश कुलकर्णी, महापौर
(फोटो वापरावा)
===Photopath===
240321\24nsk_3_24032021_13.jpg
===Caption===
गोविंदनगर येथील प्रतिबंधीत क्षेत्र नावालाच आहे. नागरीक आणि वाहनचालक विनारोकटोक येऊ जाऊ शकतात.