पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:25 AM2019-06-23T00:25:37+5:302019-06-23T00:26:40+5:30

पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 Free parking in malls in Pune Nashik street? | पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग?

पुण्याच्या धर्तीवर नाशकात मॉल्समध्ये फ्री पार्किंग?

googlenewsNext

नाशिक : पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिकमध्येही सर्व मॉल्समध्ये पार्किंग फ्री करण्याचा प्रस्ताव असून, महापौर रंजना भानसीदेखील त्यास राजी झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्किंगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्किंगसाठी शुल्क आकारून संबंधित मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉल्समध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते आणि नंतर मात्र ती पावती मॉलमधून बाहेर पडताना परत घेतली जाते. त्यामुळे शासनाच्या कर चोरीचा हा प्रकार असल्याचीदेखील चर्चा आहे. मॉल्सचालक शुल्क घेत असल्याने अनेक नागरिक मॉलच्या बाहेरच वाहने लावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील होत असते.
दरम्यान, महापालिकेच्या नगररचना अधिनियमात व्यावसायिक आस्थापनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांचा भार त्यांनीच सांभाळला पाहिजे, परंतु मॉल्सचालक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नि:शुल्क वाहनतळ करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निर्णय नाही
सिडको विभागातील प्रभाग क्रमांक २७ च्या नगरसेविका किरण गामणे यांनी यासंदर्भात गेल्या गुरुवारी (दि.२०) झालेल्या महासभेत प्रस्ताव मांडला होता. तसेच शहरातील मॉलमधील पार्किंग फ्री करण्याठी महासभेत फलक फडकावला होता. महापालिकेच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने २५ जून रोजी यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, महापौर रंजना भानसी यांनी नागरी हिताचा निर्णय असल्याने तो अमलात आणला जाईल, असे सांगितले.
नियमाचा भंग
शहरात मॉल्सची संख्या वाढत आहे. परंतु सर्वच ठिकाणी पार्किंगचे शुल्क आकारले जातात. अनेक मॉल्सला महापालिकेने वाहनतळाच्या जागेसाठी चटई क्षेत्र मुक्तची सवलत दिली आहे. मात्र, पार्किंगसाठी शुल्क आकारून संबंधित मॉल्सचालक नियमाचा भंग करतात. अनेक मॉल्समध्ये तर दुचाकी किंवा चारचाकी मोटार प्रवेशाच्या वेळीच शुल्क घेऊन पावती दिली जाते.

Web Title:  Free parking in malls in Pune Nashik street?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.