शहरात तीन मॉलमध्ये फ्री पार्किंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:16 AM2019-08-21T01:16:15+5:302019-08-21T01:16:54+5:30
पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्याने नगररचना विभागाकडे त्यांची सुनावणी झाली त्यानंतर त्याचे म्हणणे फेटाळून यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
नाशिक : पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्याने नगररचना विभागाकडे त्यांची सुनावणी झाली त्यानंतर त्याचे म्हणणे फेटाळून यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील सिटी सेंटर मॉल, त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल आणि त्यानंतर कॉलेजरोडवरील बिग बाजारला यासंदर्भातील पत्र नगररचना विभागाने दिले आहेत.
नगररचना कायद्यानुसार त्यावर सुनावणी देण्यात आली. विशेष म्हणजे या विषयावरील अंतिम आदेश काढल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना स्वाक्षरी करण्यासाठी फाइल पाठविली मात्र त्यांनी नकार देत हे आयुक्तांचे अधिकार असल्याचे
नमूद केले. त्यानंतर फेर प्रस्ताव तयार करून हा विषय पुन्हा गमे यांच्याकडे नेण्यात आला, मात्र त्यांनी सही करण्यास नकार दिला त्यातून आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी आपल्यालाच सुनावले, असा आरोप बाळा गामणे यांनी केला आहे.
४पुणे महापालिकेने सर्व मॉल्समध्ये विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु मॉल्सचालकांनी त्यास नकार देत प्रत्युत्तर सादर केले.