मानसिक दुष्परिणाम टाळण्यासाठी देणार मोफत मानसोपचार समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 03:36 PM2020-07-27T15:36:01+5:302020-07-27T15:36:26+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्र ांत बनला आहे. या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे, हदयात धडधड सुरू आहे असे वाटणे, सध्या यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व मानसिक समस्यांचे वेळीच निराकरण, समुपदेशन करण्यासाठी नाशिक महापालिका, भोसला कॅम्पस आणि नाशिक सायकॅट्रिक सोसायटीने पुढाकार घेऊन मोफत सल्ला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे समाज कधी नव्हे एवढा चिंताक्र ांत बनला आहे. या काळजीचे रूपांतर अवास्तव चिंता किंवा भीतीमध्ये होत असेल तर ते मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही. झोप न येणे, एकटे वाटणे, निराश वाटणे, आयुष्य संपविण्याची मनात इच्छा होणे, हदयात धडधड सुरू आहे असे वाटणे, सध्या यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व मानसिक समस्यांचे वेळीच निराकरण, समुपदेशन करण्यासाठी नाशिक महापालिका, भोसला कॅम्पस आणि नाशिक सायकॅट्रिक सोसायटीने पुढाकार घेऊन मोफत सल्ला केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तिन्हीमध्ये एका बैठकीत नुकताच करार झाला. ‘मनोधर’च्या माध्यमातून अशा व्यथित व्यक्ती, कुटुंबाना मोफत हेल्पलाइनद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. आपणाला सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत या केंद्रावर संपर्क साधल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडून मोफत सल्ला आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. या करारावर महापालिकेकडून आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, नाशिक सायकॅट्रिक सोसायटीचे डॉ. उमेश नागापूरकर आणि भोसला मिलिटरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. यू. वाय. कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली. तीन महिन्यांसाठी हा करार करण्यात आला असून, करारात तिन्ही संस्थांची जबाबदारी निश्चित करण्यासह सूक्ष्म नियोजन करण्यात आले. त्यानुसार महापालिका आरोग्य विभाग हा या कार्यात सहभागी होणाऱ्या लोकांना प्रशिक्षण देणे, लोकांच्या प्रबोधन, प्रोत्साहनासाठी नाशिक सायकॅट्रिक सोसायटीच्या मदतीने मोठ्या संख्येने छोटे छोटे ध्वनीसंदेश तयार करणे,ध्वनी-चित्रफित संदेशातून माहिती पोहोचवण्याचे काम करणे, याशिवाय कोरोनाग्रस्त रुग्ण, वैयक्तिक त्रस्त झालेले किंवा तणावाखाली असलेल्यांना नाशिक सायकॅट्रिक सोसायटीकडे मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर पाठविणे, समाजात तणावविरहित आणि आरोग्यसाठी पोषण उत्साही वातावरण तयार करण्यासाठी काम करण्याचे ठरले. या प्रक्रि येत सहभागी होणा-या लोकांना नाशिक सायकॅट्रिक सोसायटीकडून व्हिडिओ मिटिंग अॅपद्वारे प्रशिक्षण देणे, सेलकडे थेट वैयक्तिक संपर्क अथवा इतरांच्या माध्यमातून येणाºया रुग्णांचे समुपदेशन करणे. या संसर्गाच्या काळात आत्महत्येसारख्या प्रकारांना प्रतिबंध बसावा, तसेच समाजातील वातावरण हे उत्साही आणि आरोग्यदायी रहावे यासाठी ध्वनी अथवा चित्रफितीद्वारे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोसायटीची असेल.