मोफत तांदूळ पोहोचलाच नाही, तर वाटणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 09:56 PM2020-04-17T21:56:23+5:302020-04-18T00:26:33+5:30

मातोरी : केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मोफत तांदूळ पोहोचलाच नसल्याने वाटप करणार कसे? असा सवाल उपस्थित करीत रेशनदुकानदारांची पुरवठा विभागाकडेच बोट केल्याने कार्डधारक संभ्रमात पडले आहेत. दुकानदारांनी काहीच माहीत नसेल तर सामान्य कार्डधारकांना उत्तरे कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 Free rice is not reached, but how will it feel? | मोफत तांदूळ पोहोचलाच नाही, तर वाटणार कसा?

मोफत तांदूळ पोहोचलाच नाही, तर वाटणार कसा?

Next

मातोरी : केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मोफत तांदूळ पोहोचलाच नसल्याने वाटप करणार कसे? असा सवाल उपस्थित करीत रेशनदुकानदारांची पुरवठा विभागाकडेच बोट केल्याने कार्डधारक संभ्रमात पडले आहेत. दुकानदारांनी काहीच माहीत नसेल तर सामान्य कार्डधारकांना उत्तरे कोण देणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.  मखमलाबाद, मातोरी, दरी, चांदशी, मुंगसरे, यशवंतनगर, असे सहा रेशनदुकाने असून, लॉकडाउन कालावधीसाठी शासनाकडून सांगण्यात आलेला धान्यसाठा  अजून मिळालेलाच नाही. त्यामुळे वाटप तरी काय करावे? असा सवाल रेशन दुकानदारांनी केला आहे.  कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी शासनाने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे संचारबंदी लागू झाली, जनतेची संचारबंदी
काळात उपासमार होऊ नये यासाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय
घेतला आहे. मात्र ग्रामीण  भागातील जनता वंचितच असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title:  Free rice is not reached, but how will it feel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक