‘दप्तरमुक्त शनिवार’ ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 10:21 PM2020-01-20T22:21:33+5:302020-01-21T00:21:16+5:30

शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत.

'Free Saturday' is becoming inspiring | ‘दप्तरमुक्त शनिवार’ ठरतोय प्रेरणादायी

विद्यार्थ्यांनी दप्तरमुक्त शनिवार उपक्र मात तयार केलेले पुष्पगुच्छ.

googlenewsNext
ठळक मुद्देआनंददायी शिक्षण : नवनवीन उपक्र मांनी बालकांचा बौद्धिक विकास

पेठ : तालुक्यातील शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात
आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्या संकल्पनेतून दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म राबवण्यात येत आहे. मुख्याध्यापक गंगाराम पाडवी, शिक्षक संजय सुसलादे यांच्यातर्फे दर शनिवारी मुलांसाठी बौद्धिक मेजवानी ठरलेली असते. दैनंदिन अभ्यासाबरोबरच शालेय उपक्र मात मुलांनी सहभागी होऊन सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने राखी तयार करणे, मातीकाम, अवांतर वाचन, परसबाग स्वछता, ग्राम स्वच्छता, भेळ तयार करणे, प्राकृतिक भूरु पे,भेटकार्ड तयार करणे, डबा मनोरंजनाचा, खजिनाशोध, पर्ण कोलाज, पुष्पगुच्छ तयार करणे, चित्र रंगवणे,दहीहंडी, कागदी फुले तयार करणे, हळदीकुंकू, शब्दात लपलंय कोण?, भाषिक खेळ, गणिती कोडे, भाषिक कोडे यासारखे उपक्र म राबवले जातात. विशेष बाब म्हणजे शालेय विद्यार्थी प्रत्येक उपक्र मात आनंदाने सहभागी होतात. सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षण अधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी प्रशांत जाधव, केंद्रप्रमुख रामदास शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहुदास आदींनी शिराळे शाळेला भेट दिली.

Web Title: 'Free Saturday' is becoming inspiring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.