देशवंडी येथे बचत गटांच्या महिलांना मोफत बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 05:38 PM2019-07-04T17:38:08+5:302019-07-04T17:38:42+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अ‍ॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या सयुंक्त विद्यमाने बचत गटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.

 Free seed for women of saving groups at Deshwadi | देशवंडी येथे बचत गटांच्या महिलांना मोफत बियाणे

देशवंडी येथे बचत गटांच्या महिलांना मोफत बियाणे

Next

महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रविण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिलांना बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी बायफचे प्रकल्प प्रमुख विवेक देवरे, सुनील घुगे, सिन्नर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश कापडी, पंचायत समितीचे माजी सदस्य सोनल कर्डक, बायफ कार्यकर्ता लता सोणवने, विष्णू सानप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बायफ व महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटातील पंचवीस महिलांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन बियाण्यांचे वाटप कापडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या महिलांना मोफत माती परीक्षण करून देण्यात आले. महिला सबलीकरण व उन्नत शेतीसाठी सामाजिक भावनेतून हा उपक्र म राबविला जात आहे. यावेळी बचत गटाच्या सिंधु कापडी, हिरा कर्डक, वैशाली कर्डक, मिरा कर्डक, देऊबाई बर्के, सुनिता वाघ, नंदा बर्के, ज्योती सांगळे, सुनिता सांगळे, सुनिता कापडी, काजल बर्के, सत्यभामा कापडी, रंजना कापडी, चंद्रभागा कर्डक, उषा कर्डक, अलका कर्डक, सरूबाई कापडी, राणी कापडी आदी महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Free seed for women of saving groups at Deshwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी