मुंजवाडच्या तरुणाकडून रुग्णांसाठी मोफत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:07 PM2021-04-24T19:07:20+5:302021-04-24T19:07:57+5:30
सटाणा : सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. या संकट काळात मदतीचे हातदेखील तेवढेच महत्त्वाचे असतात. या काळात बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहन गवळी यांनी रुग्णांसाठी मोफत वाहन सेवा सुरू केली आहे.

बागलाण तालुक्यातील कोणत्याही गावातील गरजू व्यक्तीला कोरोनाचा त्रास होत असेल, त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी वाहन मिळत नसेल तर गवळी यांच्याशी संपर्क साधावा. त्यांच्या या सेवेबद्दल तालुकावासीयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कामाला प्रोत्साहित केले आहे. संकट काळात कुठलेही वाहनधारक आपले वाहन घेऊन जात नसतात. पण या युवा कार्यकर्त्यांनी स्वतःच्या वाहनाद्वारे पूर्णपणे मोफत सेवा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बागलाणवासीयांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.