देशवंडी येथे बचतगटांच्या महिलांना मोफत सोयाबीन बियाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:10 AM2019-07-05T00:10:48+5:302019-07-05T00:11:23+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बचतगटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रवीण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिलांना बियाणे वाटप करण्यात आले.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बायफ व महिंद्रा अॅण्ड माहिंद्रा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बचतगटाच्या महिलांना मोफत माती परीक्षण व सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे संघटक प्रवीण कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात महिलांना बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी बायफचे प्रकल्प प्रमुख विवेक देवरे, सुनील घुगे, सिन्नर पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष मुकेश कापडी, सोनल कर्डक, लता सोनवणे, विष्णू सानप आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महिला बचतगटातील पंचवीस महिलांना प्रत्येकी ३० किलो सोयाबीन बियाणांचे वाटप मुकेश कापडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या महिलांना मोफत माती परीक्षण करून देण्यात आले. महिला सबळीकरण व उन्नत शेतीसाठी सामाजिक भावनेतून हा उपक्र म राबविला जात आहे.
यावेळी बचतगटाच्या सिंधू कापडी, हिरा कर्डक, वैशाली कर्डक, मीरा कर्डक, देऊबाई बर्के, सुनीता वाघ, नंदा बर्के, ज्योती सांगळे, सुनीता सांगळे, सुनीता कापडी, काजल बर्के, सत्यभामा कापडी, रंजना कापडी, चंद्रभागा कर्डक, उषा कर्डक, राणी कापडी आदी महिलांसह ग्रामस्थ उपस्थित होते.