शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार मोफत पाठ्यपुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:38 PM2019-06-12T17:38:47+5:302019-06-12T17:39:04+5:30
पेठ -समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या पेठ तालुक्यातील जवळपास २० हजार ३१४ विद्यार्थांना शाळेच्या पिहल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती गटशिक्षणाधिकारी संतोष झोले ,विषयप्रमूख वसंत खैरणार यांनी दिली.

दिनांक १७ जूनपासून नवीन शैक्षणकि वर्षाला सुरु वात होत असून शाळा सुरू होण्यापूर्वी शाळा स्तरावर तालुक्यातील २२० शाळांना १३ केंद्रप्रमूखांच्या माध्यमातुन २० हजार ३१४ विद्यार्थीसाठी एक आठवडा आधीच पाठयपुस्तके पोहच करण्यात आली आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्र म अंतर्गत आता शाळेच्या पिहल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके देण्याचे नियोजन करण्यात येत असून पेठ तालुक्यात जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, अनुदानित माध्यमिक, शासकिय आश्रम शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके वाटप करण्यात येणार आहेत. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी एस.एन. झोले, विषयप्रमुख व्ही.एस. खैरणार यांच्या मार्गदर्शनाखाली गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ , केंद्रप्रमुखांना केंद्रनिहाय पुस्तकांचे वाटप केले. दोन दिवस आधीच पुस्तके शाळेवर पोहोच करण्यात येणार आहेत.