मतदान करणाऱ्या महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 07:03 PM2019-04-16T19:03:12+5:302019-04-16T19:06:17+5:30
महिलांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून कोणतीही महिला मतदान केल्यानंतर शहरातील पाचपैकी कोणत्याही केंद्रावर आपली थाायरॉईडची मोफत तपासणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी भटेवरा- जैन यांनी नाट्य परीषदेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
नाशिक : महिलांनामतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मतदान करणाºया महिलांसाठी मोफत थायरॉईड तपासणी करण्याची घोषणा क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आली आहे. ‘मतदानाची शाई दाखवा आणि थायरॉईडची मोफत तपासणी करा’ असा उपक्रम या संस्थेने सुरु केला असून कोणतीही महिला मतदान केल्यानंतर शहरातील पाचपैकी कोणत्याही केंद्रावर आपली थाायरॉईडची मोफत तपासणी करून घेऊ शकणार असल्याची माहिती संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी भटेवरा- जैन यांनी नाट्य परीषदेच्या कार्यालयात मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.
महिलांच्या आरोग्याबरोबरच मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगातनाच सध्या वयाच्या १० ते १४ वर्षांपासून थायरॉईड आजाराने मुली, महिला त्रस्त आहेत. साधारणत: वयाच्या तिशीनंतर महिलांमध्ये आढळणारा हा आजार गेल्या काही दिवसांपासून वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच सुरू होताना दिसून येतो. त्यामुळे थायरॉईडचे वेळीच निदान आणि उपचार वेळेवर होणे आवश्यक आहे. बºयाच वेळा महिला तपासणीसाठी जाण्याकरिता कंटाळा करतात आणि त्यात घरची जबाबदारी, आर्थिक परिस्थिती अशी अनेक कारणे आहेत, त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करा आणि बोटावरील मतदानाची शाई दाखवून विनामूल्य थायरॉईडची तपासणी करण्याचे आवाहन पल्लवी भटेवरा -जैन यांनी केले आहे. महिलांनी २९ एप्रिलला मतदान केल्यानंतर जोपर्यंत शाई दिसेल, तोपर्यंत तपासणीसाठी केंद्रावर संपर्क साधण्याचे आवाहन क्रस्ना डायग्नोस्टिक्सतर्फे करण्यात आले आहे. यावेळी नाशिकच्या व्यवस्थापक रुची सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो-१
तपासणी केंद्र
मतदान केल्यानंतर महिलांना नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल, अंबड येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल, द्वारका येथील झाकीर हुसेन हॉस्पिटल, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय आणि पेठ रोड येथील नामको हॉस्पिटल येथे मोफत थॉयराईड तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.