घरेलू कामगारांना मोफत प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:18 AM2021-08-22T04:18:04+5:302021-08-22T04:18:04+5:30
कोरोना योध्द्यांना राखी बांधून रक्षाबंधन पंचवटी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तपोवन मंडलातर्फे इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना ...
कोरोना योध्द्यांना राखी बांधून रक्षाबंधन
पंचवटी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तपोवन मंडलातर्फे इंदिरा गांधी रुग्णालयात कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि पोलीस कोरोना योद्ध्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी तपोवन मंडल महिला मोर्चा अध्यक्ष मनीषा बागुल, चेतना सेवक, सरचिटणीस चंद्रकला धुमाळ, रेखा गीते, मंजुषा लोहगावकर, भारती माळी, प्रियंका कानडे, लीला व्यवहारे, ज्योती जोशी उपस्थित होत्या. (फोटो २१ पंचवटी)
मनसेतर्फे मिटकरींचा निषेध
पंचवटी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांचा नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राजगड येथे निषेध नोंदविण्यात आला. यापुढे बोलताना राज ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्यास त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहण्याचा इशारा दिला. यावेळी मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, अभिजीत गोसावी, सिद्धेश सानप, अजिंक्य बोडके, अक्षय भदाणे, दत्ता इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (फोटो २१ पंचवटी १)
बाजार समित्यांमध्ये कांदा दर स्थिर
नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेत मागणी सर्वसाधारण असून, जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक काही प्रमाणात घटली आहे. दर स्थिर आहेत. मागील सप्ताहात कांद्याने दोन हजारांचा टप्पा पार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या सप्ताहात पुन्हा १,६०० ते १,८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर आले आहेत. परराज्यात फारसी मागणी नसल्याने कांद्याला उठाव कमी असल्याचे दिसून आले.