येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

By admin | Published: November 22, 2015 11:31 PM2015-11-22T23:31:45+5:302015-11-22T23:32:08+5:30

येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

Free training exam in Yeola | येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

येवल्यात मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण

Next

नगरसूल : येथील जानकी लॉन्समध्ये येवला तालुका पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परिक्षा पूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. माणिकराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे होते.
नगरसूलसह उत्तर - पूर्व भाग दुष्काळी भाग असून, येथील मुलांची स्वप्ने खूप मोठी आहेत. याची जाणीव झाल्याने नगरसूल मध्यवर्ती ठिकाण व येथील लोकसहकार्याची भावना चांगली असल्याने येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी दिली. यावेळी जिल्हा बँक संचालक किशोर दराडे बोलताना म्हणाले की, ५०० लोकसंख्या असणाऱ्या पिंपळ खुंटे गावातून २०० तरुण पोलीस झाले आहेत. याचा निश्चितच अभिमान वाटतो. केवळ पैशाअभावी, योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने मुलांची स्वप्ने हे स्वप्नेच राहिली, भविष्यात अशी वेळ मुलांवर येऊ नये म्हणून पोलीस विभागाने सुरू केलेला या उपक्र माची दखल संपूर्ण राज्यात घेतली जाऊन निश्चित ग्रामीण भागातील मुलं उंचभरारी घेतील, असा आशावाद माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी माजी सरपंच प्रमोद पाटील, संयोजक प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, सचिन देवाडगाव, प्रवीण विंचू, पोलीस उपनिरीक्षक एम. बी. खैरनार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
तालुका पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे यांनी प्रास्तविकात प्रशिक्षण केंद्राचे महत्त्व, नियोजन, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन साहेबराव घुगे यांनी केले. जे.एस, पुंड यांनी आभार मानले. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक रूपचंद वाघमारे, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक ठोंबे, संयोजक सरपंच प्रसाद पाटीलसह पोलीस निरीक्षक एस. एच. शेख, एम.बी. खैरनार, डी. ए. पाटील, एस. पी. निकम, ज्ञानेश्वर चव्हाणसह मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Free training exam in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.