चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सायकलींचा फुकट प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:56 PM2019-07-28T23:56:19+5:302019-07-28T23:56:37+5:30

स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे.

 Free travel of electric bicycles for charging | चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सायकलींचा फुकट प्रवास

चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सायकलींचा फुकट प्रवास

Next

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीने इलेक्ट्रिक सायकली सुरू केल्या खऱ्या परंतु त्यासाठी डॉक म्हणजेच सायकल स्टॅण्डवर इलेक्ट्रिक ‘चार्जिंग’ची व्यवस्था नाही. यामुळे संबंधित सेवा देणाºया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना या सायकली चार्जिंगसाठी दररोज त्यांची ने-आण करण्याची कसरत करावी लागत आहे. शिवाय या सायकली सांभाळण्याचे मोठे आव्हान संबंधित कंपनीसमोेर आहे.
स्मार्ट सिटी कंपनीने नाशिक शहरात बायसिकल शेअरिंग प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्यामुळे या सेवेत आणखी बदल करून पर्यावरणपूरक सेवा देण्याचा पुढील टप्पा म्हणून इलेक्ट्रिकल सायकली आणण्यात आल्या आहेत. गेल्या गुरुवारी (दि.१८) या उपक्रमाचे उद््घाटन महापालिकेच्या राजीव गांधी भवनात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते तसेच कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रायोगिक तत्त्वावर पंचवीस सायकली नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तथापि, कंपनीच्या अध्यक्षांसमोर घाईघाईने उद््घाटन करताना सायकल स्टॅण्डवर या सायकलींच्या चार्जिंगची कोणतीही व्यवस्था केली गेलेली नाही. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळ संबंधित कंपनीच्या कर्मचाºयांना नवेच काम लागून गेले आहे.
सायकलींना चांगला प्रतिसाद
सायकलींनादेखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा स्मार्ट सिटी कंपनीचा दावा आहे. ही सायकल तीन प्रकारात ती चालविता येते. सायकलीचा वेग ताशी २५ किलोमीटर आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ती सायकल तीस किलोमीटर चालते. या सायकलसाठी २० रु पये प्रति अर्धातास अशी भाडे निश्चित करण्यात आले आहे, तर मासिक पास १७५ रु पये असून, एका दिवसासाठीदेखील पास मिळू शकतो. मात्र तिमाही, सहामाही वा वार्षिक आकारणीचे दर अद्याप निश्चित झालेले नाही.
रात्री सायकली घेऊन जाणे आणि नंतर पुन्हा या सायकली चार्ज करून स्टॅण्डवर आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे तेही त्रस्त झाले आहेत.
कंपनीने सायकल स्टॅण्डवरच चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर अकारण सुरू असलेला हा त्रास थांबेल, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
पंचवटीत मनपाचे विभागीय कार्यालय, दिंडोरी नाका, शासकीय रु ग्णालय, प्रमोद महाजन उद्यान, जेहान सर्कल, महापालिका मुख्यालय येथील थांब्यांवर इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध आहेत.

Web Title:  Free travel of electric bicycles for charging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.