खासगी ट्रॅव्हल्सला मोकळे रान, आंतर जिल्हा बंद, पर आंतरराज्य सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:15 AM2021-05-19T04:15:11+5:302021-05-19T04:15:11+5:30
नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ...
नाशिक- कोरोना काळात संसर्ग वाढू नये यासाठी आंतरजिल्हा खासगी बस वाहतूक बंद असली तरी त्यानंतरही काही खासगी बस गाड्यांचा ट्रॅव्हलमधून आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक जोरात आहे. परराज्यातील रजिस्ट्रेशन असलेल्या असलेल्या बस थेट भाड्याने घेऊन गोरखपूर, कानपूर, उदयपूर अशा सर्वच ठिकाणी चाेरी छुपे जोरात प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, त्यावर कुणाचा अंकुश नाही.
गेल्या महिन्यात कोरोनाचे वाढत प्रमाण लक्षात घेऊन अनेक निर्बंध राज्य शासनाने घातले. त्यानंतर २२ एप्रिलपासून पुन्हा कडक निर्बंध लागू केले. आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक बंद असून ई पास शिवाय कोणालाही अन्य जिल्ह्यात जाता येत नाही अशी स्थिती असली तरी नियम धाब्यावर बसवून अनेक भागात प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यासााठी काही दलालही आहेत. नेपाळ किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान पासून बनारसपर्यंत नेण्यासाठी नाशिकसह राज्यात अनेक दलाल आहेत. गरजेनुसार प्रवाशांना गाठून पैसे घेतात आणि परराज्यातील पासिंगच्या गाड्यांचा वापर करून त्यांना थेट पोहोचवतात. अनेकांना तर राज्य परराज्यातील पोलिसांना वश करण्याची कला अवगत आहे तर काही ठिकाणी वळण मार्गाने नेले जात आहे. नाशिकमधून काही ट्रॅव्हल्सच्या बस भरून जातात. उड्डाण पूल किंवा अन्य आडनीड मार्गावरून प्रवाशांना नेताना आरोग्य नियमांचे पालन केला जात नाही. ३५ आसनी बसमध्ये सध्या पन्नासहून अधिक प्रवासी नेले जातात. सॅनिटायझर, सुरक्षित अंतर मास्क असे कसलेही पालन होत नसल्याचे सांगितले जाते.
इन्फो...
अशी आहे आकडेवारी
४५
शहरातून जाणऱ्या ट्रॅव्हल्स
२०
रोज शहरात येणाऱ्या ट्रॅव्हल्स
४००
प्रवाशांची संख्या
इन्फो..
ना मास्क ना सॅनिटायझर
सध्या ज्या ट्रॅव्हलच्या गाड्या जात आहेत. त्यात आरोग्य नियमांचे कोणतेही पालन होत नसल्याचे सांगण्यात येते आहे. मुळातच आरोग्य नियमांचे पालन करण्यासाठी शासनाचे नियम हे अधिकृत प्रवासी वाहतुकीसाठी आहेत. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीसाठी नियम कोण तपासणार आणि काय कारवाई करणार असा प्रश्न आहे.
इन्फो...
कारवाईचा बार फुसका
शहराच्या काही भागातून खासगी ट्रॅव्हल्सच्या गाड्या सर्रास भरून जात आहेत. मात्र त्यांचा शोध घेऊन कोणतीही कारवाई हेात नाही. या उलट जे अधिकृत खासगी प्रवासी वाहतूक करणारे आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई केली जाते. अनाधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्यांबाबत सौम्य धेारण असते अशी तक्रार आहे. तसेच अनेक चालक हे आडमार्गाने गाड्या बरोबर त्याच गावाकडे नेतात.
इन्फेा..
ई पास कोणाकडेच नाही
शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने बेकायदेशीररीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे फावले आहे. अशा अनाधिकृत प्रवासी वाहतूकीसाठी कोणाकडेही ई पास नसतेा. मात्र, त्यानंतरही गोरखपूर, लखनौ, कानपूर, बनारस, उदय पूर अशा ठिकाणी गाड्या जातात. मुंबई, माझीवाडा, कल्याण, पुणे येथून गाड्या भरून येतात आणि त्याच नाशिकमधून प्रवासी घेऊन जातात.