अपस्मार आजार शिबिरामध्ये २७० रुग्णांवर मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:08 AM2019-05-20T01:08:41+5:302019-05-20T01:09:02+5:30
समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले.
नाशिक : समाजात अपस्मार अर्थात मिरगी या मेंदूशीनिगडित आजाराचे प्रमाण वाढत आहेत. या आजाराच्या रुग्णांवर मोफत उपचार जिल्हा शासकीय रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग व मुंबई येथील एपिलेप्सी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपलब्ध करू देण्यात आले.
जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.१९) एकदिवसी अपस्मार रुग्ण तपासणी शिबिर घेण्यात आले. योळी २७० रु ग्णांवर मोफत निदान व उपचार करण्यात आले. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. तसेच पुढील उपचाराचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला. २७० रुग्णांमध्ये ९० महिलांचा समावेश होता.
इसीजी, सिटी स्कॅन, भौतिक उपचार, स्पीच थेरपी, ओकपेशनल थेरपी, समुपदेशन व औषध उपचार आदी सुविधा मोफत देण्यात आल्या. यावेळी मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. वीरेंद्र मानेक, डॉ. मनोज गुल्हाने, डॉ. सुमंत बियानी, डॉ. आनंद दिवाण, डॉ.धनंजय डुबेरकर, डॉ. पंकज अग्रवाल, डॉ. तेजस शेळके
यांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन रुग्णांच्या आजाराचे मोफत निदान व उपचार करत सेवा
पुरविली. सूत्रसंचालन डॉ. नीलेश पाटील यांनी केले.
तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
उद्घाटनप्रसंगी आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखील सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांच्यासह एपिलेप्सी फाउंडेशनचे डॉ. निर्मल सूर्या आदी उपस्थित होते. अपस्मार या आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात संपर्क साधून नियमितपणे औषधोपचार घ्यावा, त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व निदान उपचार उपलब्ध होतील, असे रावखंडे यांनी यावेळी सांगितले.