नाशिक ग्रामीण कोविड सेन्टरमध्ये पोलीस कुटुंबियांना मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 01:25 PM2021-05-20T13:25:36+5:302021-05-20T13:26:13+5:30
ओझर : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्तर बेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस व ...
ओझर : नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळ आडगाव येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सत्तर बेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये पोलीस व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत कोविड उपचार दिले जात आहे.
आडगाव येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आरोग्य सेवा सुसज्ज मिळावी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभीकरण करून त्याचे कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. त्याला जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. याच कोविड सेन्टर मुळे पोलीस दलाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना परिवारातील सदस्यांना उपचाराची उच्च सुविधा मोफत मिळत असल्याने कोरोनाच्या धास्तीपासून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळत आहे.
---------------------
७० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविंड सेंटर
या कोविड सेंटरमध्ये एकूण ७० ऑक्सिजन बेड आहेत. यात तेरा जण रुग्णांची देखभाल करण्यासाठी तैनात आहेत, त्यात तीन विशेषज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे.त्यामुळे सुसज्ज ग्रामीण पोलीस कोविड सेन्टरचा आदर्श पॅटर्न नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच बघायला मिळाला आहे. (२० ओझर १)
------------------------
ग्रामीण पोलीस दल यांनी एक कुटुंब समजून मुख्यालायजवळ कोविड सेंटर सुरू केले. याठिकाणी ग्रामीण पोलीस दल व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार मिळत असून प्राथमिक उपचारात मोठा हातभार रुग्णांना लागत आहे. सुविधा व उपचार बाबतीत विशेष लक्ष दिले जात आहे.
-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक, नाशिक.