शिर्डीच्या कोविड सेंटरमध्ये सिन्नरच्या रुग्णांना मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:45+5:302021-05-27T04:15:45+5:30
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी यांनी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे त्यासाठी सहकार्य मागत पत्र दिले होते. ...
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी यांनी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याकडे त्यासाठी सहकार्य मागत पत्र दिले होते. माजी आमदार वाजे, उद्योजक राजेश गडाख, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुलकर्णी हे श्री साईबाबा संस्थान भक्त मंडळाचे आजीव सभासद आहेत. माजी आमदार वाजे, गडाख व कुलकर्णी यांनी कोविड सेंटरमध्ये सिन्नर तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी समावेश करण्याची लेखी मागणी केली होती. खासदार लोखंडे, संस्थानचे कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याशी माजी आमदार वाजे यांनी चर्चा केली. संस्थांचे विविध प्रकारचे लाभ लगतचा तालुका म्हणून सिन्नरला देण्यात येत आहेत. कोविड सेंटरमध्ये सिन्नर तालुक्यातील रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी केली होती.
इन्फो
तालुकावासीयांना दिलासा
तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या पाहता उपलब्ध सुविधा खूपच तोकडी आहे. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागला. त्यात कुटुंबीयांचे हाल होण्याबरोबरच अव्वाच्या सव्वा बिल भरावे लागले. इतके करूनही काहींच्या पदरी निराशाच आली. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. शिर्डी संस्थानमधील जंबो कोविड सेंटरमुळे तालुकावासीयांना मोठा दिलासा मिळाला असून, गैरसोय दूर होणार आहे.