मुक्त विद्यापीठाला आले तारुण्य

By Admin | Published: July 1, 2017 12:30 AM2017-07-01T00:30:29+5:302017-07-01T00:30:42+5:30

‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाला १ जुलै रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे. या कालावधीत विद्यापीठाची वाटचाल विलक्षण अग्रेसर राहिली आहे.

Free university came to the university | मुक्त विद्यापीठाला आले तारुण्य

मुक्त विद्यापीठाला आले तारुण्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शिक्षणाची संधी हुकलेले तसेच काही कारणास्तव ज्यांना शिक्षण अर्धवट सोडून द्यावे लागले अशांसाठी मुक्त विद्यापीठ शिक्षण पूर्ण करण्याची संधी असेल असे जेव्हा म्हटले गेले तेव्हा अनेकांनी या विद्यापीठातील विद्यार्थी हा तिशीच्या पुढचा असेल असेच निदान केले होते. सुरुवातीची काहीवर्षे तसा अनुभवही आला. परंतु आता २८ वर्ष पूर्ण करणारे मुक्त विद्यापीठात अधिकाधिक तरुण होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या वयोमानावरून दिसून येते.  ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे ब्रीद घेऊन सुरू झालेल्या विद्यापीठाला १ जुलै रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहे. या कालावधीत विद्यापीठाची वाटचाल विलक्षण अग्रेसर राहिली आहे. संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाची आजची विद्यार्थी संख्या सहा लाखांच्या पुढे असून, समाजातील जवळपास सर्वच घटकांसाठी अभ्यासक्रम उपलब्ध असल्याने विद्यापीठात तरुण विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तसेही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी कुठल्याही वयाची अट नसल्याचे वयाचा मुद्दा महत्त्वाचा मानला नाही तरी तरुणवर्ग विद्यापीठाशी जोडला जाणे विद्यापीठाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे.  विद्यापीठाच्या सुरुवातीच्या काळात तरुणवर्ग विद्यापीठाच्या शिक्षणाकडे वळत नसावा असे आकडेवारीवरून दिसते. कौटुंबिक जबाबदारी आल्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले किंवा लवकर लग्न झाल्यामुळे विशेषत: महिलांना शिक्षण सोडावे लागले. काम करून शिक्षण करण्याचा प्रयत्न करताना शिक्षण सुटले आणि कामच करावे लागले अशा कौटुंबिक आणि आर्थिक विवंचनेत अडकलेल्यांसाठी मुक्त विद्यापीठ आशेचा किरण होते. त्यामुळे साहजिकच सुरुवातीचे काही वर्षे मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांचे सरासरी वय २५ पेक्षा अधिक होते.  कालौघात विद्यापीठाने शैक्षणिक प्रगती केली आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाला तांत्रिकतेची जोड दिल्याने तरुण मुक्त विद्यापीठाकडे आकर्षित होऊ लागले आणि त्याप्रमाणात प्रवेश होऊ लागले. विद्यापीठ तरुण होण्याच्या याप्रक्रियेत विद्यापीठ बरेच पुढे गेले असून, अलीकडची आकडेवारी पाहिली, तर १९ ते ३० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची आजची संख्या मोठी आहे.  मागीलवर्षीच्या आकडेवारीवरून ही बाब अधिकच अधोरेखित होते. १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या (३७,०६९) १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थी संख्या (६२,७५३) २० वर्ष वयोगट- (७०,०५४), २१ वर्ष वयोगट-(६३,०३६), २२ वर्ष वयोगट-(५५,०४५), २३ वयोगट-(४६,४८५), २४ वर्ष-(३८,०६५), २५ वर्ष-(३१,१८१), २६ वर्ष-(२४,६९०), २७ वर्ष-(२०,६३३), २८ वर्ष-(१६,०९७), २९ वर्ष-(१४,७९६) आणि ३० वर्ष-(१३,१६४) याप्रमाणात आकडेवारी असून, सदर आकडेवारीकडे पाहिल्यास तरुण मुलांचा ओढा विद्यापीठाकडे वाढलेला दिसतो.  तरुण मुले विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य देत असल्याने विद्यापीठानेदेखील समाधान व्यक्त केले असून, काळाबरोबर विद्यापीठ बदलत गेल्याने विद्यार्थी संख्येचा मानबिंदू विद्यापीठाने राखल्याचे कुलगुरूंनी सांगितले. झपाट्याने बदलणाऱ्या आर्थिक सामाजिक जबाबदारीमुळे ज्या मुलांना रोजगार मिळविण्यासाठी धडपड करावी लागते, असे विद्यार्थी विद्यापीठात मोठ्या प्रमाणात आहेत. काम करून शिक्षण घेणारी आजची तरुण पिढी शिक्षणालाही तेव्हढेच महत्त्व देत असेल तर विद्यापीठ अधिक गतिशील होईल असा दावाही विद्यापीठाने केला आहे. आकडेवारीचा विचार केला तर बहुतांश विद्यार्थी हे दहावी, बारावीनंतर मुक्तविद्यापीठाचा मार्ग धरत असल्याचे चित्र आहे. यामध्ये कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वाधिक तरुण आहेत.
विद्यापीठाने पारंपरिक व्यवसायाला अभ्यासक्रमाची दिलेली जोड, असंघटित क्षेत्रातील कामांचे अभ्यासक्रम, शेतीक्षेत्रातील पदवी, रोजगारभिमुख शिक्षण आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमामुळे तरुण विद्यार्थी विद्यापीठाकडे वळले आहेत. त्यामुळे दरवर्षी विद्यापीठाची तरुण विद्यार्थी संख्या ही वाढतच आहे.
कैद्यांसाठी मोफत शिक्षण
राज्यातील काही जिल्हा आणि मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना यापुढे मुक्त विद्यापीठाकडून मोफत शिक्षण दिले जाणार आहे. यापूर्वी कैद्यांच्या अभ्यासवर्ग आणि प्रवेशाचा खर्च कारागृह प्रशासनच करीत होते. त्यामुळे नाशिक आणि नागपूर या दोन सेंट्रल जेलमधील कैद्यांनाच शिक्षणाची संधी मिळत होती. आता कुलगुरू ई वायुनंदन यांनी या संदर्भात सामंजस्य करार करताना राज्यातील ज्या कैद्यांना शिक्षणाची आवड आहे, त्यांना प्रवेश देण्याची तयारी केली आहे. पोलीस आणि आर्मी अभ्यासक्रम यूजीसीच्या नियमानुसार चालविण्याचा प्रश्नही मार्गी लागल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

Web Title: Free university came to the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.