क्रेडाईच्या वतीने बांधकाम कामगारांना मोफत लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:15 AM2021-04-01T04:15:21+5:302021-04-01T04:15:21+5:30
बांधकाम क्षेत्र हे देशातले कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. तसेच कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या क्षेत्रामध्येदेखील ...
बांधकाम क्षेत्र हे देशातले कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगार देणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. तसेच कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या क्षेत्रामध्येदेखील बांधकाम क्षेत्राचा समावेश आहे.
क्रेडाई ही देशातील २१ राज्यांतील १३०० पेक्षा जास्त रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संघटना आहे. या घोषणेच्या माध्यमातून क्रेडाईकडून देशात केंद्र सरकारने सुरू केलेल्या लसीकरणाच्या मोहिमेला वेग देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील गरजू लोकांना कोरोनाची लस देऊन कोरोनावर लवकरात लवकर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नाला हातभार लावण्यात येणार असल्याचं सांगितले आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १६ जानेवारीला सुरू केलेल्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ ६० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या क्रेडाई संघटनेच्या माध्यमातूनदेखील एक लाखाहून अधिक कामगार आणि कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.