चारा छावणीतील शेतक-यांना मोफत भाजीपाला, किराणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 04:16 PM2019-06-12T16:16:54+5:302019-06-12T16:17:15+5:30

अंदरसूल : मुक्कामी दीडशे शेतक-यांना दिलासा

Free vegetable, grocery, for farmers in fodder camp | चारा छावणीतील शेतक-यांना मोफत भाजीपाला, किराणा

चारा छावणीतील शेतक-यांना मोफत भाजीपाला, किराणा

Next
ठळक मुद्देचारा छावणीत मोठ्या प्रमाणावर पशुधन दाखल

अंदरसूल : अंदरसूल परिसरातील शेतक-यांनी पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणीत मोठ्या प्रमाणावर पशुधन दाखल करीत आश्रय घेतल्याने चारा समस्येचा प्रश्न सुटण्यास मदत झाली मात्र त्यांच्या देखभालीसाठी चारा छावणीत मुक्कामास असलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मोफत किराणा माल व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले.
येवला तालुक्याचे माजी आमदार मारोतराव पवार, युवानेते कुणाल दराडे व शिवसेना पदाधिकारी यांनी अंदरसूल येथील चारा छावणीतील सुमारे दीडशे शेतक-यांना किराणा माल व भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. याप्रसंगी रतन बोरनारे, भास्कर कोंढरे, झुंजार देशमुख, मंकरद सोनवणे, मनिषा जगताप, अमोल सोनवणे, दिपक जगताप, नारायण दादा देशमुख, शिवाजी वडाळकर, भागिनाथ ढमाले,राजु पागिरे, भागिनाथ थोरात, मारु ती वाकचौरे, पंडित मेहकर, पृथ्वी देशमुख, रवींद्र वाकचौरे, प्रमोद देशमुख, कौतिक ऐंडाईत, संजू घोडके, बाळू देशमुख, काकासाहेब देशमुख, शंकर गायकवाड आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Free vegetable, grocery, for farmers in fodder camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक