आमदार आहेर यांच्याकडून मोफत भाजीपाला, किराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:16 AM2020-04-20T00:16:21+5:302020-04-20T00:16:42+5:30
कोरोना या विषाणूमुळे भारतात लॉकडाउन असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे अन्नधान्यविना हाल होत असून, चांदवड-देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात शेवटच्या गरजूपर्यंत भाजीपाला अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू मोफत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
चांदवड : कोरोना या विषाणूमुळे भारतात लॉकडाउन असल्यामुळे अनेक गोरगरिबांचे अन्नधान्यविना हाल होत असून, चांदवड-देवळा मतदारसंघातील आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून चांदवड तालुक्यात शेवटच्या गरजूपर्यंत भाजीपाला अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू मोफत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे.
यावेळी तालुक्यात दोन ते तीन हजार जनतेला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू आमदार डॉ. आहेर व भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक घरापर्यंत पाठवणार आहेत. यावेळी आमदार डॉ. आहेर यांनी ‘मदत नव्हे कर्तव्य’ आहे असे सांगितले.
चांदवड तालुक्यातील चांदवड, धोडंबे, वडनेर व शिंगवे येथील गरजू व्यक्तींपर्यंत भाजीपाला पोहोचवण्यात आला तसेच खेलदरी१५, वडाळीभोई १७, चांदवड येथील अदिवासी वस्ती येथे २० गरजू भागात किराणा साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाने १५ स्वयंसेवक अहोरात्र प्रत्येक गरजू पर्यंत भाजीपाला किराणा यासारख्या जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याचे काम करीत आहेत. पंचायत समिती सदस्य डॉ.नितीन गांगुर्डे, माजी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ, वैभव धामणे, महेश खंदारे, मनोज बांगरे, बाळा पाडवी, मुकेश आहेर, सागर आहेर, हेमंत खरोटे, रोशन क्षत्रिय, राजन निकम, भूषण क्षत्रिय, यावेळी उपस्थित होते. चांदवड शहरात मोठा राजवाडा, डावखर नगर एकलव्य नगर, हत्ती खाना, सिद्धार्थ नगर, रोहिदास नगर, सोमवार हट्टी, कोंबड वाडी, तळवाडे रोड येथील ६३० कुटुंबांना भाजीपाला जीवनश्यक वस्तू वाटण्यात आले. (वा.प्र.)