ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 06:53 PM2019-03-18T18:53:08+5:302019-03-18T18:54:06+5:30

कंधाणे : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत सटाणा येथील छत्रपती युवा फांउडेशनने सटाणा शहराला जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातुन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केला आहे.

Free water supply to the villagers | ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

ग्रामस्थांना युवकांनाकडून मोफत पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देशहरवासीयांना लगेचच मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे

कंधाणे : समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत सटाणा येथील छत्रपती युवा फांउडेशनने सटाणा शहराला जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातुन टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केला आहे.
सटाणा शहराला तीव्र पाणीटंचाई सामना करावा लागत असुन पाण्यासाठी नागरिकांना पंधरा ते वीस दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे. चालु वर्षाच्या अपऱ्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचे भविष्य अंधकारमय ठरू लागले आहे.
शहरासाठी मंजूर असलेल्या योजनांनाही पुर्णत्वाचे ग्रहण लागले असुन तहानलेली जनता हतबल प्रशासनाचा अनुभव अनुभवत आहे. सध्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांना खाजगी टँकर मालकांकडून पदरमोड करून पाणी घ्यावे लागत आहे.
शहरातील पाणीटंचाईची भीषणता व नागरिकांचे पाण्यासाठी होत असलेली फरपट पाहाता येथील छत्रपती युवा फांऊडेशन या सामाजिक संस्थाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत नागरिकांना मोफत पाणीटँकर सुरू करण्याची कल्पना मांडली, संघटनेचे अध्यक्ष चेतन मोरे यांनी त्याला होकर देत शहरवासीयांना लगेचच मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.
प्रतिक्रि या...
शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. संघटनमार्फत नागरिकांना मोफत पाणीपुरवठा केला जात असुन दिवसाला जास्तीत भागात टँकर पोहचवण्याचा फाउंडेशनचा मानस आहे. सध्या काही भागात या टँकरच्या फेऱ्या चालू असुन आवश्यक असलेल्या भागात हा टँकर पोहचविला जाणार आहे.
चेतन मोरे,
अध्यक्ष, छत्रपती युवा फांऊडेशन, सटाणा.
 

Web Title: Free water supply to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.