एलईडी दिव्यांचा मार्ग मोकळा
By admin | Published: May 20, 2014 12:50 AM2014-05-20T00:50:25+5:302014-05-20T00:50:25+5:30
नाशिक : शहरात खासगीकरणातून पथदीपांच्या फिटिंग्ज बदलून त्याजागी एलईडी फिटिंग्ज बसविण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक : शहरात खासगीकरणातून पथदीपांच्या फिटिंग्ज बदलून त्याजागी एलईडी फिटिंग्ज बसविण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली आहे. महापालिकेने गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत शासनाच्या तेराव्या वित्त आयोगाच्या निधीतून मिळणार्या अर्थसहाय्यातून एलईडी दिवे शहरात बसविण्याचा निर्णय घेतला होता. निधी अपुरा पडला तर खासगीकरणातून ही योजना राबविण्याची उपसूचना त्यास जोडण्यात आली होती. महापालिकेने त्यासाठी निविदा काढताना मात्र संपूर्ण काम खासगीकरणातून करण्याचा निर्णय घेण्यात आला; शिवाय निविदाप्रक्रिया योग्य रीतीने राबविली नाही आणि वीज बचतीच्या रकमेतून ठेकेदाराला परतावा देण्यात येणार असताना, बचत पन्नास ते साठ कोटी रुपयांची होणार असली, तरी ठेकेदाराला आठ वर्षांत २०२ कोटी अदा करण्याचा प्रस्ताव होता व त्यास शहर विकास आघाडीचे गटनेता गुरुमित बग्गा, संजय चव्हाण, तसेच शिवसेनेचे नगरसेवक कोमल मेहरोलिया यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गेल्या ४ एप्रिल रोजी त्यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून सर्र्वाेच्च न्यायालयात अपील करण्यासाठी सहा आठवड्यांची मुदत दिली होती. त्यानुसार संबंधितांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)