विल्होळी अंडरपास करण्याचा मार्ग मोकळा

By Admin | Published: May 15, 2017 04:55 PM2017-05-15T16:55:17+5:302017-05-15T16:55:17+5:30

मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होऊन अनेक वर्षे होऊनही विल्होळी येथील अंडरपासचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते.

Free the way to undercoil | विल्होळी अंडरपास करण्याचा मार्ग मोकळा

विल्होळी अंडरपास करण्याचा मार्ग मोकळा

googlenewsNext

पाथर्डी फाटा : मुंबई-आग्रा महामार्गाचे सहापदरीकरण होऊन अनेक वर्षे होऊनही विल्होळी येथील अंडरपासचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. आता या कामाचे रिटेंडरिंग झाले असून, कार्य आदेशही निघाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई-आग्रा महामार्गाचे गोंदे ते पिंपळगाव सहापदरीकरण होऊन सुमारे पाच वर्षे झाली आहेत. मात्र यादरम्यान अत्यंत आवश्यक असलेल्या विल्होळी येथील अंडरपासचे काम या-ना त्या कारणाने आजवर रखडलेले होते. सुरु वातीच्या ठेकेदार कंपनीने हे काम करण्याचा एक-दोनदा प्रयत्न केला असता, काही स्थानिक लोकांनी विरोध केल्याने काम पुढे सरकले नव्हते. विल्होळी गाव पंचक्र ोशीतील गावांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने महामार्ग ओलांडणाऱ्या वाहनांची व नागरिकांची दिवसभर गर्दी असते. येथे शाळा, ग्रामपंचायत ग्रुप सोसायटी, महत्त्वाची व्यापारी आस्थापने, हॉटेल्स, छोटे-मोठे कारखाने, गुदामे आदि गोष्टींमुळे दिवसभरातून अनेकवेळा रस्ता ओलांडणे भाग पडते. याशिवाय गावाची नाशिकशी असलेली कनेक्टिव्हिटी गावाच्या उत्तरेला असलेली शेती, नाशिकचा बाजार हाट, कॉलेज व शासकीय कार्यालयांमध्ये असलेले वेगवेगळ्या निमित्ताने जाणे-येणे यामुळे अंडरपासअभावी रस्ता ओलांडणे धोक्याचे होत होते.

Web Title: Free the way to undercoil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.