‘लोकमत’तर्फे उद्यापासून मोफत योग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 09:45 PM2020-06-16T21:45:07+5:302020-06-17T00:17:29+5:30
नाशिक : आंतररराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकमत, केंद्रीय आयुष मंत्रालय व किचन इसेन्सियल यांच्यातर्फे गुरुवारपासून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना घरी बसून सलग तीन दिवस होणाऱ्या मोफत कार्यशाळेतून योगसानांचे विविध प्रकार शिकायला मिळणार आहेत.
नाशिक : आंतररराष्ट्रीय योग दिनानिमित्त लोकमत, केंद्रीय आयुष मंत्रालय व किचन इसेन्सियल यांच्यातर्फे गुरुवारपासून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नागरिकांना घरी बसून सलग तीन दिवस होणाऱ्या मोफत कार्यशाळेतून योगसानांचे विविध प्रकार शिकायला मिळणार आहेत. भारतीय योगा मॅरेथॉनमध्ये सलग १०३ तास योग करून गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणाºया विक्रमवीर योगातज्ज्ञ प्रज्ञा पाटील योगाभ्यासकांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर करून दाखविणार आहेत. या योग शिबिराचे फेसबुक लाइव्ह //nashiklokmatevents या लिंकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरी बसून वाढलेले पोट अथवा वजन कमी करण्याची चिंता सध्या अनेक नागरिकांना सतावत आहे. अशा स्थितीत वजन किंवा पोट कमी करण्यासाठी योग हा सर्वांत महत्त्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो. महिलांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी योगाभ्यास फायदेशीर ठरतो. त्यामुळेच योगगुरुंसह विविध डॉक्टरांकडूनही सुदृढ आरोग्यासाठी योगासने करण्याचा सल्ला दिला जातो. हीच बाब लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘लोकमत’तर्फे गुरुवार (दि. १८) ते रविवार (दि.२१) या कालवधीत लाइव्ह वेबिनारच्या माध्यमातून योग शिबिराचे अयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातून योगतज्ज्ञ प्रज्ञा पाटील ध्यानधारणा व प्राणायाम, श्वास घेण्याचे तंत्र, साधारण आजारासाठी योग थेरपी, सूर्यनमस्कार यांसारख्या विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर क रून दाखविणार असून, वाचकांना गुरुवार, शुक्र वार व शनिवार असे सलग तीन दिवस सकाळी ७ ते ७.३५ यावेळेत मोफत कार्यशाळेत घरी राहूनच सहभागी होता येणार आहे. शिबिराच्या शेवटच्या दिवशी रविवारी (दि.२१) ग्रॅन्ड फिनाले होणार असून, त्यानंतर शिबिरात सहभागी होणाºया सर्वांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
------------------
नोंदणी आवश्यक
योग शिबिरात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून,https://bit. ly/yogaworkshopnsk या लिंकवर जाऊन अथवा लोकमतच्या अंकात प्रकाशित जाहिरातीतून क्यूआर कोड स्कॅन करूनही वाचकांना शिबिरात सहभागासाठी नोंदणी करता येणार आहे. दरम्यान, शिबिरात सहभागी योगाभ्यासकांनी सैल व आरामदायी कपडे परिधान करावेत, योगा करण्यापूर्वी पेय व अन्नपदार्थ खाऊ नयेत, चांगली चटई वापरावी, असे अवाहन करण्यात आले आहे.