स्वातंत्र्य सैनिक ओंकार लिंगायत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:14 AM2017-08-30T01:14:01+5:302017-08-30T01:15:16+5:30

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ओंकारआप्पा गोविंदआप्पा लिंगायत (९५) यांचे मंगळवारी (दि. २९) दुपारी वृद्धापकाळाने नाशिक मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. बुधवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता मालेगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Freedom fighter Onkar Lingayat passed away | स्वातंत्र्य सैनिक ओंकार लिंगायत यांचे निधन

स्वातंत्र्य सैनिक ओंकार लिंगायत यांचे निधन

Next

संगमेश्वर : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते ओंकारआप्पा गोविंदआप्पा लिंगायत (९५) यांचे मंगळवारी (दि. २९) दुपारी वृद्धापकाळाने नाशिक मुक्कामी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे व दोन भाऊ असा मोठा परिवार आहे. बुधवारी (दि. ३०) सकाळी १० वाजता मालेगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनात या. ना. जाधव यांच्या नेतृत्वाखालील ओंकारआप्पा लिंगायत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेत १९४३ साली पुण्याच्या आगाखान पॅलेस मोर्चात ते सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना इंग्रज सरकारने अटक केल्याने येरवडा तुरुंगात सहा महिने सश्रम कारावास भोगला होता. टेलिफोनच्या तारा तोडणे, पोस्ट आॅफिस लुटणे आदींच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. साथी शिवाजी पाटील, विठ्ठलराव काळे आदी समाजवादी कार्यकर्त्यांसमवेत ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. राष्टÑ सेवा दलाच्या कार्यात सहभाग घेऊन या चळवळीच्या वाढीसाठी त्यांनी योगदान दिले होते. संगमेश्वरातील महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेची उभारणी करण्यात या. ना. जाधव, माधवराव वडगे, डॉ. नवलराय शहा, निहाल अहमद आदींसमवेत त्यांनी कार्य केले.  मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मालेगाव मर्चंट्स बँकेचे दोन वेळा संचालक व चेअरमन, नगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. साने गुरुजी परिवार, साने गुरुजी रुग्णालय, व्यापारी संघटना, लोकसमितीच्या माध्यमातून सदैव कार्यरत असत. अनेक वर्ष त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे शासकीय मानधन घेतले नाही. नंतरच्या काळात सामाजिक कार्यासाठी ते मानधन वाटून देत असत. शहरातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांना आर्थिक पाठबळ देण्यात त्यांचा पुढाकार असायचा. भारताचे राष्टÑपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले होते. भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे ओंकारआप्पा लिंगायत हे शेवटपर्यंत खादीची वस्त्रे परिधान करीत असत. अत्यंत कडक शिस्तीचे व स्पष्ट वक्तेपणासाठी ते प्रसिद्ध होते.

Web Title: Freedom fighter Onkar Lingayat passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.