स्वातंत्र्य ज्योत रॅली मुंबईला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:11 AM2018-05-28T00:11:39+5:302018-05-28T00:11:39+5:30
वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली.
भगूर : वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली. सकाळी ९ वाजता स्वा.वीर सावरकर जन्मस्थान स्मारकात मुंबई जयस्तुते मित्रमंडळाच्या वतीने सावरकर पुतळा जन्मखोलीत पूजा करून भगूर नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे, नगरसेविका कविता यादव, अनिता ढगे, मनीषा कस्तुरे, नगरसेवक संजय शिंदे, प्रमोद घुमरे, नीलेश हास, सुरेश वालझाडे, विक्र म सोनवणे, मधुसुदन गायकवाड, शामराव ढगे, मनोज कुवर, मुत्युंजय कापसे, प्रताप गायकवाड उपस्थित होते. दरम्यान, भगूर वीर सावरकर उत्सव समितीच्या माध्यमातून खासदार हेमंत गोडसे यांनी स्मारकात दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण केला. यावेळी अशोक मोजाड, वसंत पाटील, तानाजी करंजकर, प्रशांत कापसे, राजाभाऊ सोनवणे, अनिल भवार, कैलास गायकवाड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिटको चौकात स्वागत
भारतीय जनता पार्टीचे खासदार पूनम महाजन यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भगूर ते मुंबईपर्यंत स्वातंत्र्य ज्योत दौड काढण्यात आली. भगूर येथील वि. दा. सावरकर जन्मस्थळापासून सुरु वात झाली. चाळीस तरु ण-तरु णी ही ज्योत मुंबई येथील विलेपार्लेपर्यंत घेऊन जाणार आहेत. या स्वातंत्र्य ज्योत दौडचे नाशिकरोड येथील बिटको चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन हांडगे, युवा मोर्चा नाशिकरोड अध्यक्ष शांताराम घंटे, हेंमत नारद, सागर काजळे, कृष्णा बोराडे, प्रवीण जाधव, उल्हास नागरे, गौरव बाफणा आदी उपस्थित होते.
सावरकर यांना आज अभिवादन
४स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंतीनिमित्त येथील अभिनव भारत मंदिरात सोमवारी (दि.२८) सकाळी १० वाजता अभिवादनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, नगरसेवक शाहू खैरे, अजिंक्य साने आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अभिनव भारत मंदिराचे विश्वस्त
प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले आहे.