फ्रीज, फुलदाण्यांची तपासणी करण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:27 AM2017-08-31T00:27:47+5:302017-08-31T00:27:53+5:30
शहरात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्याधिकाºयांनी वरिष्ठ पर्यवेक्षकांना दररोज २० घरांना भेटी देऊन तेथील फ्रीज, फुलदाण्यांची कसून तपासणी करण्याचे आदेशित केले असून, त्याबाबतचा अहवाल रोजच्या रोज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने पछाडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढच होत असून, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन डेंग्यूच्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्याधिकाºयांनी वरिष्ठ पर्यवेक्षकांना दररोज २० घरांना भेटी देऊन तेथील फ्रीज, फुलदाण्यांची कसून तपासणी करण्याचे आदेशित केले असून, त्याबाबतचा अहवाल रोजच्या रोज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने ठिकठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. डेंग्यूचे डास हे स्वच्छ पाण्यात अंडी घालत असल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या घरात प्रामुख्याने, फ्रीज, फुलदाण्या याठिकाणी डेंगीच्या डासांच्या अळ्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी पंचवटी भागात दौरा करत विविध घरांना भेटी देऊन डेंगीच्या डासांच्या अळ्या नष्ट केल्या. दरम्यान, डास नियंत्रण कामात पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी कमी पडत असल्याचेही आरोग्याधिकाºयांच्या निदर्शनास आले.