राज्य परिवहन महामंडळातर्फे उद्योगांसाठी मालवाहतूक सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 06:15 PM2020-07-15T18:15:28+5:302020-07-15T18:18:50+5:30
सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी ...
सिडको : उद्योगव्यवसायासाठी व कारखान्यातील उत्पादित केलेला माल व आॅर्डर्स तातडीने ग्राहकांपर्यन्त पोहचता यावा यासाठी राज्य परिवहन मंडळातर्फे प्रवाशी वाहतुकीबरोबरच, कोविड- १९ या महामारीमुळे उद्बबहवलेल्या परिस्थितीमुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे . त्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य परिवहन महामंडळास मालवाहतुकीस परवानगी दिलेली आहे; याअनुषंगाने सातपूर तसेच अंबड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये तयार होणारा माल व यासाठी आवश्यक असणार्या कंच्या मालाची वाहतूक राज्य परिवहन मंडळातर्फे केली जाणार असल्याचे परिवहन अधिकाऱ्यांच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.
राज्य परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक नितीन मेंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, पर्यवेशक
यासाठी परिवहन अधिकारी विभाग नियंत्रक नितीन मेंद, विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील, पर्यवेशक हरीश पाटील व आयामा पदाधिकारी यांची बैठक अंबड येथील आयामा रिक्रि एशन सेंटर येथे बैठक पार पडली .
यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांनी सांगितले की राज्य परिवहन महामंडळास महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे, तात्काळ सेवा उपलब्ध आहे, अत्यंत माफक दर आहेत, सुरिक्षत माल वाहतूक सेवा आहे, वेळेवर वितरण होणार आहे, महाराष्ट्रात सर्वत्र २४ तास सेवा, विश्वास प्राप्त सेवा उपलब्ध आहे . महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वाहतुकीचे जाळे निर्माण केलेले आहे .पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या आहेत तरी आपण सर्व उद्योगांना मालवाहतुकीसाठी आयामातर्फे कळवावे असे आवाहन परिवहन अधिकार्यानी आयामा पदाधिकार्याना यावेळी केले. त्यासाठी संपर्क साधण्याचा आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले. या बैठकीत आयामांचे अध्यक्ष वरून तलवार, माजी अध्यक्ष सल्लागार समितीचे चेअरमन धनंजय बेळे, माजी अध्यक्ष राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सचिव राजेंद्र पानसरे व राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित विषयावर विस्तृत चर्चा झाली .