लासलगांवच्या ‘वनस्थळी’ केंद्राला फ्रान्सच्या शिष्टमंडळाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:34 PM2018-02-27T14:34:28+5:302018-02-27T14:34:28+5:30
लासलगांव :- वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्राच्या लासलगांव शाखेस मंगळवारी फ्रान्स देशातील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली.
लासलगांव :- वनस्थळी ग्रामीण महिला व बालविकास केंद्राच्या लासलगांव शाखेस मंगळवारी फ्रान्स देशातील आत्रांद सामाजिक संस्थेच्या सहा सदस्यीय महिला शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी वनस्थळी संस्थेत काम करणाºया महिलांशी मुक्त संवाद साधून संस्थेच्या कामाची माहिती घेतली. यावेळी मारी नोएल फ्रांसे, फ्रॉस्वा फुरशाँ, रेमॉद दा गीआॅस, इल्हम बुलासाल, स्टेफनी लेक्लेर, अॅनमारी दूरला, वनस्थळी संस्थेच्या सचिव भारती भिडे, लासलगांव शाखेच्या प्रमुख अनिता गंधे, विणा दिक्षति, सायली कदम, मयुरी घाणेकर, प्रा.शिरीष गंधे, किशोर होळकर, प्रल्हाद खडांगळे, नुमान शेख, प्रा.विजय जैन, गजानन आहेर, अंकुश गरु ड आदी उपस्थित होते.